Archive for October, 2013

Gold in Banian Tree

झाडाच्या पानात सोन्याचा अंश: अभ्यासक

पंढरपूर: मोहोळ आणि मंगळवेढा सीमेवर असलेल्या बेगमपूर गावात सोन्याची खाण असल्याचा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर इथल्या मातीत आणि वडाच्या झाडांच्या पानात सोन्याचा अंश असल्याचं सांगण्यात येत आहे.

भीमेच्या काठावर असलेलं बेगमपूर. याच गावातून औरंगजेबानं साडेचार वर्ष हिंदुस्थानचा कारभार हाकला. बेगमपूरमध्ये बादशहाची टांकसाळही होती. त्यामुळं एकेकाळी इथून सोन्याचा धूर निघत होता. आता याच गावातील मातीत आणि वडाच्या झाडाच्या पानात सोन्याचे अंश असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

नदीकिनारी उभा असलेला हा वड २०० वर्ष जुना आहे. या वडाच्या पानाची झळाळी सोनेरी आहे.
त्यामुळं पुरातत्व विभागानं गांभीर्यानं याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु एम.जी.ताकवले यांनी, २००० साली विद्यापीठाची टीम पाठवून इथं संशोधन केलं. इथल्या मातीत कोलार आणि हट्टी गोल्डमाईनपेक्षा जास्त सोन्याचा अंश असल्याचं समोर आलं. याची माहिती भूगर्भशास्त्र विभागाला आणि सरकारलाही दिली. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळं अभ्यासकांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.

शोभन सरकार यांच्यामुळं उन्नावचं खोदकाम देशभर गाजलं. पण तिथंही पुरातत्व खात्यानं केलेल्या संशोधनात टणक धातू असल्याचे पुरावे मिळाले होते.  आता महाराष्ट्रात भीमेकाठी सोनं असल्याचं मातीपरीक्षणात समोर आलं आहे. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करुन खोदकाम केलं तर भीमेकाठच्या मातीतल्या सोन्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा सोन्याचा धूर निघेल.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 30, 2013 at 2:29 pm

Categories: World News   Tags:

Here Is The Trailer Of Dhoom 3

Presenting the DHOOM:3 Theatrical Trailer of the most awaited film of 2013 – DHOOM:3. Starring Aamir Khan, Abhishek Bachchan, Katrina Kaif & Uday Chopra.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 2:22 pm

Categories: Filmy   Tags:

Peshwa’s wealth 500 million, by which we can purchase USA

अबब…अमेरिकेला विकत घेण्याइतकी पेशव्यांकडे संपत्ती

pune_p

सध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे. मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे य़ाबाबत जोरदार वादविवाद सुरू आहेत. हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहासतज्ञ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशीलाचा शोध लागलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

५१ हजार ४०२ हिरे ,
११, ३५२ माणके,
१ लाख , ७६ हजार , ०११ मोती
२७,६४३ पाचू
नीलम , पुष्कराज , पोवळी , लसन्या आणि हजारो जड जवाहीरे. अबब…ही संपती ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. या संपत्तीतून अमेरिकेला विकत घेतले जाऊ शकते.

ही संपत्ती आहे एकेकाळी दिल्लीचे तख्त गाजवणा-या पेशव्यांची. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र ही संपत्ती पेशव्यांचीच असल्याचा पुरावा इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांना नुकताच शोधलाय. पुरालेखागार विभागामध्ये मिळालेल्या या कागदपत्रांमधील उल्लेखावरून पेशव्यांच्या श्रीमतीची आपल्याला प्रचिती येते.

या रत्नांची आत्ताची किंमत ५०० लाख कोटी इतकी असल्याचं दावा इतिहास तज्ज्ञांचा आहे. उन्नाव इथे पुरातत्व खात्याच्या वतीन सुरु असलेला खजिना नक्की कोणाच्या मालकीचा अशी उत्सुकता सर्वानाच आहे. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या मुख्य खजिन्यातल्या संपत्तीच्या तपशील मिळालाय. पेशव्यांच्या खजिन्यातील केवळ या जड-जवाहिरांची किंमत ५०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे. मुख्य म्हणजे शनिवारवाड्याची ही श्रीमंती पद्मनाभ मंदिरात आढळलेल्या संपत्तीहून किती तरी जास्त आहे.

इंग्रजांनी १८१७ साली या खजिन्याची लूट केली होती. ही लुट झाल्या नंतरही या खजिन्यातली काही संपत्ती बाजीराव पेशव्यांनी आपल्यासोबत कानपूरला नेला होता. तो नंतर नानासाहेब यांना प्राप्त झाला. १८५७ च्या युद्धात नानासाहेब यांच्या शोधात असणा-या इंग्रजांच्या हातात पुन्हा एकदा नानासाहेबांचा खजिना पडला… लुट केलेल्या या खजिन्याची किंमत १ कोटी असल्याची नोंद इंग्रजांनी केली आहे.

आजच्या काळात याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. पेशव्यांच्या काळात एका राजाकडे एवढी संपत्ती होती यातूनच आपल्याला पेशावाईची श्रीमंती दिसून येते. पेशव्यांच्या या खजिन्याची लूट झाल्यानंतर ती संपत्ती कुठे आहे हे अजूनही गुढच आहे. परंतु पेशव्यांच्या या खाजिन्यामुळेच इंग्रज वैभवशाली झाल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे.

 

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 26, 2013 at 11:48 am

Categories: Property   Tags: , , , , , , , , , , ,

Jobs in Indian Air Force for Pilot and Observer

पायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी भरती

 

भारतीय नौदलातर्फे पायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पायलट – पायभूत हवाई प्रशिक्षणानंतर लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स चालवण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये अत्याधुनिक (कटिंग एज टेक्नोलॉजी) विमानं चालवण्याचीही संधी मिळते

ऑब्झर्व्हर – प्रशिक्षणानंतर इंडियन नेव्हल एव्हिएशन आर्ममध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये विविध अत्याधुनिक साधने (सॉनिक्स, रडार, सोनार्स, दळणवळणाची साधने) हाताळण्याची संधी मिळते. नौदलाच्या सर्व ऑपरेशन्समध्ये प्रत्यक्ष विमानात बसून टेहाळणी करण्याची संधी मिळते.

वयोमर्यादा –

सर्वसाधारण उमेदवार -१९ ते २४ वर्षे

सी.पी.एल. (कमर्शियल पायलट लायसन्स) धारक – १९ ते २५ वर्षे

शैक्षणिक पात्रता –

सर्वसाधारण उमेदवार – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसंच १२वीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणं आवश्यक आहे.

सी.पी.एल. (कमर्शियल पायलट लायसन्स) धारक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसंच १२वीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे डि.जी.सी.ए.कडून दिलं जाणारं कमर्शियल पायलट लायसन्स असणं आवश्यक आहे.

पायलटसाठी केवळ पुरुष उमेदवार पात्र असतात. तर ऑब्झर्व्हरसाठी पुरुष व महिला दोन्ही पात्र असतात.

निवड प्रक्रिया –

शैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी बोलावले जाते. एस.एस.बी. मुलाखत पाच दिवस चालते. पहिल्या टप्प्यात इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन व ग्रुप डिस्कशनचा समावेश होतो. तर दुस-या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क व मुलाखतीचा समावेश होतो. पायलटसाठी पायलट अॅप्टिट्यूड टेस्ट असते. पायलट व ऑब्झर्व्हर या दोघांसाठी एव्हिएशन मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. प्रशिक्षणानंतर उमेदवारांची सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती केली जाते. विविध भत्त्यांसह सब-लेफ्टनंटचे मासिक वेतन अंदाजे रू. ८३,०००/- इतकं असतं.

प्रवेश अर्ज –

प्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन भरायचे आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १८ ऑक्टोबर २०१३ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी www.nausena-bharti.nic.in ही वेबसाईट पहावी.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 17, 2013 at 5:05 am

Categories: Jobs   Tags:

Sales Tax Inspector Examination

 

विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा

शासनाच्या विक्रीकर विभागातील एकूण ८३ पदांच्या भरतीकरिता आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक(पूर्व)परीक्षा-२०१३ रविवार २२ डिसेंबर रोजी ३५ जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरणा-या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

पात्रतेच्या अटी

भारतीय नागरिकत्व.

वयोमर्यादाः दि.१ फेब्रुवारी,२०१४ रोजी किमान १९ वर्षे असावे व ३३ वर्षांपेक्षाजास्त नसावे.

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अहर्ता. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार तात्पुरते पात्र असतील.

विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१३ करिता विहित माहिती स्विकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहिल.

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंञज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहिल.

परीक्षा शुल्कः

१)अमागास रू. २६०/- (दोनशे साठ)२) मागासवर्गीय रू.१३५.०० (एकशेपस्तीस) 3) माजी सैनिक – रू.१०.००(दहा)

अर्ज करण्याची पद्धतः

प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर ‌कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड(Web-based)ऑनलाईन अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटव्दारे दि.१ ऑक्टोबर, २०१३ ते दि.२१ ऑक्टोबर, २०१३ या कालावधीतच सादर करणे आवश्यक राहिल.

विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

आयोगाने ‌निश्चित केलेले परीक्षा शुल्क खालील पद्धतीने भरता येईल.

(१) भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाव्दारे (२) नेटबँकिंग (३)डेबिट कार्ड (४)क्रेडिट कार्ड (५)संग्राम केंद्र/ सीएससी (नागरिक सेवा केंद्र)

www.mahaonline.gov.in येथे संग्राम केंद्र (ग्रामपंचायतींमध्ये) आणि सीएससीची सूची उपलब्‍ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्ध आहेत.

स‌हायक मोटार वाहन

निरीक्षक परीक्षा – २०१३

आयोगातर्फे ‘सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क’ पदाच्या भरतीक‌रिता पूर्व व मुख्य परीक्षेऐवजी सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा – २०१३ करीता केवळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार एकच परीक्षा रविवार १५ डिसेंबर, २०१३रोजी मुंबईसह महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर व पुणे या जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धती अर्ज मागवण्यात येत आहेत.

पात्रताविषयक अटी

भारतीय नागरिक.

वयोमर्यादाः

१ फेब्रुवारी,२०१४रोजी किमान १९ वर्षे असावे व ३३ वर्षांपेक्षा (मागास वर्गाकरिता३८वर्षांपेक्षा) जास्त नसावे.

शैक्षणिक अहर्ता-

१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) किंवा महाराष्ट्र शासनाने ए.एस.सी.च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता आणि २) राज्य तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेली स्वयंचल अभियांत्र‌िकी (ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग) किंवा यंत्र अभियांत्र‌िकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) मधील पदविका (३वर्षीय अभ्यासक्रम) किंवा केंद्र वा राज्य शासनाने या पदविकांशी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता.

अनुभव,अतिरिक्त आवश्यक अर्हता, शारीरिक पात्रता यांचा संक्षिप्त तपशील www.mpsc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

परीक्षा शुल्कः

१) अमागास रू. ४१० – २) मागासवर्गीय रू.२१० /- ३) माजी सैनिक – रू. १०/-

अर्ज करण्याची पद्धतः प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर ‌कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटव्दारे दि.११ ऑक्टोबर,२०१३ ते दि.१ नोव्हेंबर,२०१३ या कालावधीतच सादर करणे आवश्यक राहील.विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

आयोगाने ‌निश्चित केलेले परीक्षा शुल्क खालील पद्धतीने भरता येईल.

(1) भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाव्दारे (२) नेटबँकिंग (३)डेबिट कार्ड (४)क्रेडिट कार्ड (५)संग्राम केंद्र/सीएससी (नागरिक सेवा केंद्र) ww.mahaonline.gov.in येथे संग्राम केंद्र (ग्रामपंचायतींमध्ये) आणि सीएससीची सूची उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 5:02 am

Categories: Jobs   Tags:

Want to make career as Doctor

डॉक्टर व्हायचंय?

वैद्यकीय प्रवेशांसाठी आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ NEET या परीक्षेएवजी ‘एमएच-सीईटी’ MH-CET ही परीक्षा द्यावी लागणार आहे; पण ‘एमएच-सीईटी’ MH-CETच्या काठिण्यपातळीत मात्र नक्कीच फरक पडला आहे. आता तुम्हाला या परीक्षेसाठी फक्त बारावीचाच नव्हे, तर अकरावीचा अभ्यासही कसून करावा लागणार आहे.

या वर्षी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही. या वर्षी महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांतील ८५ टक्के प्रवेश महाराष्ट्र शासन घेणार असलेल्या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेतूनच (एमच-सीईटी) होणार आहेत, हे पूर्वीच निश्चित झाले होते. गेल्याच आठवड्यात या प्रवेश परीक्षेचे स्वरूपही निश्चित झाले. तरीही विद्यार्थी व पालकांच्या मनात त्या विषयी अनेक शंका आहेत. या परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी माहिती देत आहोत.

या परीक्षेत अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. ‘नीट’ऐवजी ‘एमएच-सीईटी’ MH-CET द्यावी लागणार, ही बातमी कळल्यापासून अनेक विद्यार्थ्यांनी असे गृहीत धरले होते, की ‘एमएच-सीईटी’ MH-CETही परीक्षा आजवर जशी फक्त बारावीच्या अभ्यासक्रमावर होत होती, तशीच या वर्षीही फक्त बारावीच्याच अभ्यासक्रमावर आधारित असेल. अशा विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीवरील लक्ष काढून घेतले असण्याची शक्यता आहे; पण आता हा गोंधळ दूर झालेला असल्याने त्यांना आपल्याला किती तयारी करायची आहे, याचा अंदाज आला असेल. सुदैवाने हा निर्णय दिवाळीच्या सुट्टीपूर्वी आल्याने आगामी तीन आठवड्यांच्या सुट्टीचा उपयोग अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी होऊ शकतो.

अकरावीचा अभ्यास महत्त्वाचा

या परीक्षेत अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत, ते अजून स्पष्ट झालेले नाही; परंतु जर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळ, गुण इत्यादी गोष्टी ‘नीट’प्रमाणेच असतील, तर एकूण (१८०) प्रश्नांपैकी ४० टक्के प्रश्न (७२) अकरावीच्या अभ्यासक्रमावर, तर ६० टक्के प्रश्न (१०८) बारावीच्या अभ्यासक्रमावर असतील. प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण मिळणार आहेत. याचा अर्थ असा, की अकरावीच्या अभ्यासक्रमावरील सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक देता आली, तर ७२० पैकी २८८ गुण मिळू शकतात. या वर्षी ‘नीट’ दिलेल्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले असता, कोणत्या कॉलेजात प्रवेश मिळाला, याचा आढावा घेतलात, तर अकरावीच्या अभ्यासक्रमावरील प्रश्नांच्या गुणांचे महत्त्व लक्षात येईल. त्यामुळे आमचा मुख्य सल्ला हाच राहील, की येत्या दिवाळीच्या सुट्टीत प्रथम अकरावीच्या अभ्यासक्रमाची तयारी पूर्ण करा. अकरावीचा अभ्यासक्रम शिकून त्यावरील परीक्षा देऊन सहा महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी विसरला असाल. तेव्हा पुन्हा एकदा बोर्डाचे पाठ्यपुस्तक वाचण्यापासून सुरुवात करा. एक फायदा असा आहे, की या सहा महिन्यांत तुमचे वय वाढले आहे. अर्थातच, तुमचे आकलनही वाढलेच असणार. ज्या संकल्पना तुम्हाला अकरावीत शिकताना समजल्या नसतील, त्या या अभ्यासात समजतील. तात्पर्य काय, की तुम्हाला वाटतो, तेवढा अकरावीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास अवघड जाणार नाही. या अभ्यासामुळे तुमच्या अकरावीच्या अभ्यासक्रमातील ज्या संकल्पना स्पष्ट होतील, त्याचा उपयोग तुम्हाला बारावीच्या अभ्यासक्रमावरील तयारीसाठीसुद्धा होईल. अकरावीच्या तयारीमुळे अभ्यासाची सवय लागेल. अकरावीच्या अभ्यासक्रमावरील प्रश्न सोपे वाटू लागले, त्याची उत्तरे बरोबर येत गेली, की अर्थातच तुमचा आत्मविश्वासही वाढेल. आणि ‘जमतंय रे बाबा,’ असे छानसे फीलिंगही येईल.

बारावीची तयारी

अकरावीचा अभ्यासक्रम तयार झाला, की बारावीच्या तयारीला सुरुवात करा. तोपर्यंत बारावी अभ्यासक्रम वर्गात, क्लासमध्ये शिकवून झालेला असेल. अकरावीच्या तयारीचा उपयोग ज्या धड्यांच्या अभ्यासासाठी होईल, अशा बारावीच्या धड्यांची तयारी आधी करा, म्हणजे सोपे जाईल. तयारी खालीलप्रमाणे करता येईल.

> प्रत्येक धडा बोर्डाच्या पाठ्यपुस्तकातून वाचा. ओळन्ओळ शब्द अन् शब्द वाचा. मेमरी-बेस्ड प्रश्न पुस्तकातील कोणत्याही ओळीवर, शब्दावर येऊ शकतो. त्यासाठी एकही शब्द गाळू नका.

> प्रत्येक धड्यातील व्याख्या, नियम, गृहितके एका वहीत लिहून काढा.

> प्रत्येक संकल्पना नीट समजावून घ्या. त्यासाठी संदर्भग्रंथ (ज्यांची यादी पुस्तकात शेवटी दिलेली असते) वाचा. शिक्षकांना शंका विचारा. एकदा तुम्हाला एखादी संकल्पना नीट समजली, की त्यावरील कोणत्याही बहुपर्यायी प्रश्नाचे (multiple choice question) उत्तर, तो प्रश्न कितीही फिरवून, वेगळया पद्धतीने किंवा अवघड शब्दांत विचारला, तरी देता येईल.

> थिअरीची अशी छान तयारी झाली, की प्रत्येक धड्यावरची गणिते सोडवायला हवीत. किती सोडवावीत, या संख्येला मर्यादा नाही. जोवर तुम्हाला एखाद्या धड्यावरील तयारीची पूर्ण खात्री वाटत नाही, तोवर त्या धड्यावरील गणिते सोडवत राहा. यामुळे त्या धड्यातील सर्व सूत्रे (formulae) आपसूक पाठ होतील. सुरुवातीला गणित सोडवायला जास्त वेळ लागेल कदाचित; पण पुढे सरावाने तो कमी होईल. तुम्हाला तुमच्या चुका कळतील. आकडेमोडीचा वेग वाढेल, जो तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेत उपयोगी पडेल.

> यानंतर सर्वांत शेवटी प्रत्येक धड्यावरील बहुपर्यायी प्रश्न (Multiple Choice Questions) सोडवायला घ्या. त्यासाठी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणत्या विषयासाठी कोणत्या प्रकाशनाचे पुस्तक वापरावे, हे तुमच्या त्या विषयाच्या शिक्षकांना किंवा मागील वर्षी ‘नीट’मध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला विचारून घ्या. कमीत कमी प्रत्येक धड्यावरील ५० प्रश्न तरी सोडवा. ऑनलाइन वेबसाइटचा यासाठी सर्वांत चांगला उपयोग होतो. यात तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे बरोबर उत्तर, त्याचे सोल्युशन किंवा स्पष्टीकरण तर मिळतेच; पण यात काही शंका असेल, एखादी पायरी समजली नसेल, तर त्याचे निरसनही करून घेता येते.

अशा चार टप्प्यांतील तयारी तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत करावी. त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे, असे मी सुचवेन.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 4:56 am

Categories: Jobs   Tags:

Scope of career in Car Designing

कार डिझायनिंगमधील स्कोप – Scope of career in Car Designing

माझा मुलगा बारावी सायन्सला आहे. त्याला कार डिझाइयनिंगमध्ये रस आहे. त्यासाठी कोणते अभ्यासक्रम आहेत? इंजिनीअरिंग करून त्यात जाण्याचा मार्ग आहे काय? याचे पुण्यात कोणते कोर्सेस आहेत? या क्षेत्रात करिअर करण्यासाठी भारतात किती स्कोप आहे? कृपया माहिती द्यावी.

कार, बाइक या मुलांच्या आवडीच्याच नव्हे, तर त्यांना वेडे करून सोडण्याच्याच गोष्टी असतात. अर्थात, तुमच्या मुलाप्रमाणेच या रस्त्याला जाण्याचा ध्यास घेणारे आजवर अनेक विद्यार्थी मला भेटलेही आहेत. म्हणून यातील प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर येथे देत आहे.

डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन आणि कार डिझाइन असा हा खडतर रस्ता आहे. डिझाइनचे भारतात उत्तम कोर्सेस आहेतच. एनआयडी, सृष्टी ही त्यातील संस्थांची पुण्याबाहेरची नावे. डीएसके सुपइन्फोकॉम, सिम्बायोसिस, एमआयटी, व्हीआयटी आदी पुण्यातील संस्था आहेत, जेथे डिझाइनचा कोर्स आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आयआयटीत सोय आहे. आर्किटेक्ट, डिझाइनर, इंजिनीअर्स आणि बीएफए झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच्या प्रवेश परीक्षेला बसता येते. जागा फक्त २० असतात. हे सर्वच कोर्स बऱ्यापैकी खर्चिक असतात. साधारण चार लाख ते सात लाख रुपयांपर्यंत एकूण खर्च येतो.

यात करिअर करण्यासाठी भारतात किती स्कोप आहे, या प्रश्नाची विविध उत्तरे आहेत. उत्तम डिझायनरला भारतात प्रचंड मागणी व स्कोप आहे; पण केवळ कार डिझाइनरला किती मागणी आहे, याबाबत नक्की उत्तर नाही. आजही पूर्णतः भारतीय कार म्हणून केवळ ‘नॅनो’चा उल्लेख होतो. बाकीमध्ये सहकार्य तत्त्वावर (असेम्ब्ली) काम चालते. त्यामुळे त्याबाबत फार खोल विचार करायचीसुद्धा गरज नाही, हे आपल्या नक्की लक्षात येईल. मुलांना पटणे मात्र कठीण जाते.

जगभराची स्थिती काय आहे, याचा जाता जाता उल्लेख फार महत्त्वाचा ठरतो. सर्व महत्त्वाच्या कार निर्मात्यांच्या डिझायनर यादीत इटालियन नावांचे प्राबल्य आहे. जसे एक्स्ट्रा लार्ज कार म्हणजे अमेरिकन, छोटी उपयुक्त कार म्हणजे जपानी किंवा कोरियन आणि महागडी; पण अत्यंत सुरक्षित आणि अल्टिमेट मशीन म्हणजे जर्मन कार; तसेच कार डिझायनिंग म्हणजे वर्चस्व इटालियन्सचे.

एक भारतीय म्हणून यात फरक पडावा, अशी जरी इच्छा असली, तरी शक्यता खूप कमी दिसते, हेही तितकेच खरे आहे. ‘नॅनो’चा डिझायनर मात्र अस्सल महाराष्ट्रायीन आहे, हे नक्की!

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 4:53 am

Categories: Jobs   Tags:

Jobs in Indian Navy

भारतीय नौदलात भरती

1

भारतीय नौदलातर्फे पायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पायलट – पायभूत हवाई प्रशिक्षणानंतर लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स चालवण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये अत्याधुनिक (कटिंग एज टेक्नोलॉजी) विमाने चालवण्याचीही संधी मिळते.

ऑब्झर्व्हर – प्रशिक्षणानंतर इंडियन नेव्हल एव्हिएशन आर्ममध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये विविध अत्याधुनिक साधने (सॉनिक्स, रडार, सोनार्स, दळणवळणाची साधने) हाताळण्याची संधी मिळते.

वयोमर्यादा – सर्वसाधारण उमेदवार – १९ ते २४ वर्षे

सी.पी.एल. (कमर्शिअल पायलट लायसन्स) – १९ ते २५ वर्षे

शैक्षणिक पात्रता –

सर्वसाधारण उमेदवार – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसेच बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणे आवश्यक आहे.

सी.पी.एल. (कमर्शिअल पायलट लायसन्स) धारक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसेच बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे डी.जी.सी.एकडून दिले जाणारे कमर्शिअल पायलट लायसन्स असणे आवश्यक आहे. पायलटसाठी केवळ पुरुष तर ऑब्झर्व्हरसाठी पुरुष व महिला दोन्ही पात्र असतात.

निवड प्रक्रिया – शैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. एस.एस.बी. मुलाखत इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन व ग्रुप डिस्कशन, मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क व मुलाखतीचा समावेश होतो. पायलटसाठी पायलट अॅप्टिटयूड टेस्ट असते. पायलट व ऑब्झर्व्हर या दोघांसाठी एव्हिएशन मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. प्रशिक्षणानंतर सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती केली जाते. विविध भत्त्यांसह सब-लेफ्टनंटचे मासिक वेतन अंदाजे रू. ८३,०००/- इतके असते.

प्रवेश अर्ज –

प्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन भरायचे आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १८ ऑक्टोबर २०१३ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी www.nausena-bharti.nic.in ही वेबसाईट पहावी.

 

 

भारतीय नौदलातर्फे पायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पायलट – पायभूत हवाई प्रशिक्षणानंतर लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स चालवण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये अत्याधुनिक (कटिंग एज टेक्नोलॉजी) विमाने चालवण्याचीही संधी मिळते.

ऑब्झर्व्हर – प्रशिक्षणानंतर इंडियन नेव्हल एव्हिएशन आर्ममध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये विविध अत्याधुनिक साधने (सॉनिक्स, रडार, सोनार्स, दळणवळणाची साधने) हाताळण्याची संधी मिळते.

वयोमर्यादा – सर्वसाधारण उमेदवार – १९ ते २४ वर्षे

सी.पी.एल. (कमर्शिअल पायलट लायसन्स) – १९ ते २५ वर्षे

शैक्षणिक पात्रता –

सर्वसाधारण उमेदवार – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसेच बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणे आवश्यक आहे.

सी.पी.एल. (कमर्शिअल पायलट लायसन्स) धारक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसेच बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे डी.जी.सी.एकडून दिले जाणारे कमर्शिअल पायलट लायसन्स असणे आवश्यक आहे. पायलटसाठी केवळ पुरुष तर ऑब्झर्व्हरसाठी पुरुष व महिला दोन्ही पात्र असतात.

निवड प्रक्रिया – शैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. एस.एस.बी. मुलाखत इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन व ग्रुप डिस्कशन, मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क व मुलाखतीचा समावेश होतो. पायलटसाठी पायलट अॅप्टिटयूड टेस्ट असते. पायलट व ऑब्झर्व्हर या दोघांसाठी एव्हिएशन मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. प्रशिक्षणानंतर सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती केली जाते. विविध भत्त्यांसह सब-लेफ्टनंटचे मासिक वेतन अंदाजे रू. ८३,०००/- इतके असते.

प्रवेश अर्ज – प्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन भरायचे आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १८ ऑक्टोबर २०१३ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी www.nausena-bharti.nic.in ही वेबसाईट पहावी.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 4:50 am

Categories: Jobs   Tags:

Free Engineering Course

मोफत इंजिनीअरींग

 

स्पेशल क्लास रेल्वे अॅप्रेंटिंस परीक्षेद्वारे भारतीय रेल्वेतून इंजिनीयरींगचं शिक्षण मोफत घेता येतं. तसंच प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये पहिल्या वर्षापासून दरमहा स्टायपेंडही मिळतो. प्रशिक्षणानंतर भारतीय रेल्वेच्या मेकॅनिकल इंजिनीअरींग विभागात इंजिनीअर म्हणून नोकरीदेखील मिळते. या अनोख्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १२ वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतात. यासाठीची प्रवेश परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (यु.पी.एस.सी.) घेते. या परीक्षेसाठी वयोमर्यादा १७ ते २१ वर्ष इतकी असते.

लेखी परीक्षा-

या परीक्षेत तीन पेपर्स असतात. एकूण गुण ६०० असतात. पेपर एक, सामान्यज्ञान, इंग्रजी व मानसशास्त्रीय कसोटय़ांवर आधारित असून २०० गुणांचा असतो. पेपर दोनमध्ये, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रावर आधारित प्रश्न विचारले जातात. (गुण २००) पेपर तीनमध्ये गणितावर आधारित प्रश्न असतात. (गुण २००)

प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ प्रकारचं असतं. लेखी परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखतीसाठी २०० गुण असतात.

प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. यासाठी www.upsconline.nic.in ही वेबसाइट पहावी. महाराष्ट्रामध्ये परीक्षेचं केंद्र मुंबई व नागपूर इथे असतं. परीक्षा १२ जानेवारी २०१४ला होणार आहे. यासाठी अर्ज पाठवण्याची मुदत ४ नोव्हेंबर २०१३ पर्यंत आहे.

भारतीय रेल्वेच्या मेकॅनिकल विभागामध्ये तरुण अभियंते निवडण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय रेल्वे चार वर्षांचं प्रशिक्षण देते. चार वर्षांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांशी करार केला जातो. प्रशिक्षण संपल्यावर विद्यार्थ्यांची कामगिरी बघून रेल्वेत नोकरी संदर्भात निर्णय घेतला जातो. निवड झालेला विद्यार्थी रेल्वे वर्कशॉपमध्ये आपलं सैध्दांतिक(क्लासरुम टीचिंग) व प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण करतो. या कार्यकालात बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा(रांची) या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांनं उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षांच्या प्रशिक्षण काळात दरमहा रु. ९१०० तर तिसऱ्या व चौथ्या वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांसाठी दरमहा रु.९४०० व पुढच्या सहा महिन्यांसाठी दरमहा रु.९७०० स्टायपेंड दिला जातो. चार वर्षांचं प्रशिक्षण संपल्यानंतर विद्यार्थ्यांला गुणवत्तेच्या आधारावर रेल्वेमध्ये मेकॅनिकल इंजिनीअर या पदावर काम करता येतं.

सविस्तर जाहिरातीसाठी www.upsc.gov.in ही वेबसाईट पहावी. (एक्झामिनेशन नोटिफिकेशन करंट या मार्गाने जाहिरात पहावी )

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 4:43 am

Categories: Jobs   Tags:

Astronomy Study

करा अंतराळाचा अभ्यास – Astronomy Study

करिअर घडवण्यासाठी ज्योतिषातल्या ग्रह ताऱ्यांचा कितपत उपयोग होतो, हे माहीत नाही. पण तुम्हाला अवकाशाच्या अभ्यासात रस असेल तर, याच ग्रहगोलांच्या संशोधन विषयात तुम्ही उत्तम करिअर घडवू शकता.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ ही आशिया खंडातील तसंच जगातील अंतराळविषयीची पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम उपलब्ध असणारी पहिली संस्था आहे. या अभ्यासक्रमांचा भर हा अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि उपयोजन यावरच आहे. या संस्थेची स्थापना २००७ साली झाली. वर्षभराच्या कालावधीतच या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. केंद्र सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून आय.आय.एस.टी. कार्य करते. या संस्थेचं उद्दिष्ट देशभरात विज्ञान शाखेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अवकाश क्षेत्रातील जागतिक स्तरावरील शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून अवकाश क्षेत्रातील उपक्रमावर भारताचा ठसा उमटवणं हे आहे. अंतराळ संशोधन या विषयाची व्याप्तीही मोठी आहे. या संस्थेत उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत माहिती घेऊ या.

पदवी अभ्यासक्रम

बी.टेक. (एव्हिऑनिक्स)

एव्हिऑनिक म्हणजे एव्हिएशन इलेक्ट्रॉनिक्स. या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याबरोबरीने एव्हिएशन क्षेत्रातील या शाखांच्या उपयोजितेबाबत प्रशिक्षणही समाविष्ट असतं. उदा. एरोस्पेस व्हेईकल व उपग्रह व्यवस्थेतील नियंत्रण प्रणाली, त्यांची रचना व निर्मिती, सॅटेलाइट कम्युनिकेशन, इन्फर्मेशन थिअरी व कोडिंग, मोबाइल कम्युनिकेशन, मायक्रोवेव्ह, इंटिग्रेटेड सर्किटस्, अँटेना इंजिनीअरिंग अशा विविध विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात होतो.

बी.टेक. (एरोस्पेस इंजिनीअरिंग)

एरोस्पेस इंजिनीअरिंग हे रॉकेट सायन्स या शाखेशी साधर्म्य असणारं आहे. मेकॅनिकल इंजिनीअरिंगशी संबंधित अभ्यासाचा पायाभूत अभ्यासक्रमात समावेश असतो. उदा. सॉलिड व फ्लुइड मेकॅनिक्स, थर्मोडायनॅमिक्स, ह‌िट ट्रान्सफर, मटेरियल सायन्स इ. या पायाभूत अभ्यासानंतर त्याचं उपयोजन असणारे एरोडायनॅमिक्स, गॅस डायनॅमिक्स, प्रोपल्शन, फ्लाइट मेकॅनिक्स, थिअरी ऑफ मशिन्स, एरोस्पेस स्ट्रक्चर्स इत्यादी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी लॉन्च व्हेईकल तसंच विमानं व अवकाशयान यांची रचना व निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची एरोस्पेस उद्योगक्षेत्रातली आव्हानं पेलण्यासाठी उत्तम तयारी पूर्ण होते. एरोडायनॅमिक्स डिझाइन, प्रॉपल्शन सिस्टीम, प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग अशा क्षेत्रांत काम करण्यासाठी त्यांची पूर्ण तयारी झालेली असते. ‘इस्रो’ या भारतातील अग्रगण्य व जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थेतील विविध प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते. या अनुभवानंतर त्यांना एरोस्पेस सबसिस्टीम व अन्य संबंधित क्षेत्रांत संशोधन करणा-या संघांचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते.

बी.टेक. (फिजिकल सायन्स)

अंतरिक्ष मोहिमा या विशिष्ट वैज्ञानिक हेतू व उद्दिष्टे समोर ठेवून आखलेल्या असतात. त्यामुळे वरील अभ्यासक्रमाची रचना अंतराळ संशोधनाची आवश्यकता लक्षात घेऊन केलेली आहे. यात अॅस्ट्रोनॉमी- अॅस्ट्रोफिजिक्स, रिमोट सेन्सिंग, अर्थ सिस्टीम सायन्स व केमिकल सिस्टीम यांचा अंतर्भाव केलेला आहे. या चारपैकी एका विभागातून पाच विषयांची विद्यार्थ्यांना निवड करायची असते. अॅस्ट्रोनॉमी व अॅस्ट्रोफिजिक्स या शाखेत विश्वउत्पत्तीशास्त्र, विश्वातील विविध आकाशगंगा, सौरमालिका, आकाशगंगेबाहेरील विश्व यांचा अभ्यास केला जातो. भौतिकीय शास्त्रांमधील मूलभूत संकल्पना वापरत ताऱ्यांमधील अंतरं मोजणं, अंतरिक्ष मोहिमांच्या आखणीसाठी मूलभूत माहिती संकलित करणं, अन्य ग्रहांवरील जीवसृष्टीच्या शक्यतेचा वेध घेणं या सर्वांचा समावेश या अभ्यासात होतो.

पृथ्वीवरील जमीन, वनं, पाणी, खनिजं इत्यादी नैसर्गिक संसाधनं, हवामान आदींचा उपग्रहांद्वारे मिळणा-या माहितीचं संकलन व आकलनाद्वारे अभ्यास करणं हे रिमोट सेन्सिंगचं महत्त्वपूर्ण कार्य असतं. उपग्रहांद्वारे मिळणा-या माहितीच्या आधारे नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर, संवर्धन शक्य होतं. तसंच भूकंप, त्सुनामी, वादळं अशा नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळून संभाव्य नुकसान कमी करता येते.

‘अर्थ (Earth) सिस्टीम सायन्स’मध्ये पृथ्वीचे विविध स्तर, त्यांची वैशिष्ट्यं यांचा अभ्यास केला जातो. यात भौगोलिक संरचनांचा अभ्यास, खनिजशास्त्र (सॉलिड अर्थसायन्स) तसंच उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे नैसर्गिक आपत्तींबाबत शास्त्रीय अंदाज वर्तवणं, हवामानातील बदलांचा व त्याच्या परिणामांचा अभ्यास, पर्जन्य, वारे, ऊर्जाउत्सर्जन इत्यादींचा अभ्यास (अॅटमॉस्फिअरिफ सायन्सेस) अशा बहुविध विषयांचा अभ्यास केला जातो.

केमिकल सिस्टीम अभ्यासशाखेत उपग्रह, त्यांना अवकाशात नेणा-या यंत्रणेसाठी आवश्यक इंधनं आणि घटक पदार्थाचा अभ्यास यांचा समावेश होतो. या पदार्थाची गुणवत्ता उंचावत अत्यंत कार्यक्षम घटकांची निर्मिती व त्यासाठी संशोधन यावर या अभ्यासक्रमाचा भर आहे. नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक संशोधनाशी संयोग साधत केमिकल सिस्टीम्सचा आकार लहान होऊन कार्यक्षमता कित्येक पट वाढवता येऊ शकते का, यावरही या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी विचार करणं अपेक्षित आहे.

पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया

आय.आय.एस.टी.मधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यावर्षीपासून जेईई(मुख्य) प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे. या प्रवेशपरीक्षेबाबत अधिक माहिती http://www.jeemain.nic.in या वेबसाईटवरुन घ्यावी.

अभ्यासक्रमांना प्रवेश देताना जेईई(मुख्य) परीक्षेच्या गुणांना ६० टक्के वेटेज असेल तर बारावीच्या गुणांना ४० टक्के वेटेज असेल.

जेईई(मुख्य) परीक्षेनंतरचे विद्यार्थ्यांच्या निवडीचे निकष संस्थेकडून ठरवण्यात येतात. त्यासाठी संस्थेची वेबसाईट पहावी.

शिक्षणाचा सर्व खर्च (निवास व खाणं वगैरे) भागवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना असिस्टंटशिपची सुविधा दिली जाते.

पदव्युत्तर अभ्यासक्रम

संस्थेमध्ये इस्त्रोच्या प्रोजेक्ट्सशी सुसंगत विविध विषयातील एम.टेकचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

> एम.टेक. इन सॉफ्टकॉम्प्युटिंग अॅण्ड मशीन लर्निंग

> एम.टेक. इन रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅण्ड मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन

> एम.टेक. इन ऑप्टिकल इंजिनिअरिंग

> एम.टेक. इन केमिकल सिस्टीम्स

> एम.टेक इन प्रोप्लशन

> एम.टेक इन डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग

> एम.टेक इन एरोडायनॅमिक्स अॅण्ड फ्लाईट मेकॅनिक्स

> एम.टेक इन स्ट्रक्चर्स

> एम.टेक इन अर्थ सिस्टीम सायन्स

> एम.टेक इन जिओइन्फोर्मेटिक्स

> एम.टेक इन कंट्रोल सिस्टीम्स

> एम.एस. इन अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स

> एम.टेक इन मशिन लर्निंग अॅण्ड कॉम्प्युटिंग

> एम.टेक इन सॉलिड स्टेट टेक्नॉलॉजी

> एम.टेक इन व्ही.एल.एस.आय. अॅण्ड मायक्रोसिस्टीम्स

> एम.टेक इन मटेरियल्स सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंगचे पदवीधर(बी.ई./बी.टेक) किंवा बेसिक सायन्समधील पदव्युत्तरपर्यंतचे (एम.एस्सी./एम.एस.) शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र असतात. या परीक्षेमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. प्रवेशाकरिता लेखी परीक्षा/ मुलाखत घेतली जाते. मे महिन्यात अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची जाहिरात प्रकाशित केली जाते.

डॉक्टरेट अभ्यासक्रम

एरोस्पेस इंजिनीअरिंग, एव्हिऑनिक्स, रसायनशास्त्र, मानव्यशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र या विषयांमध्ये पीएच.डी. करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी लेखी परीक्षा व मुलाखत द्यावी लागते. पीएच.डी.साठी इंजिनीअरिंगमधून मास्टर्स (पदव्युत्तर शिक्षण) केलेले विद्यार्थी पात्र ठरतात, परंतु पदवी अभियांत्रिकीमधील कुशाग्र बुद्धिमत्ताधारक विद्यार्थ्यांचाही चांगल्या शैक्षणिक कामगिरीवर व संशोधनातील कलाप्रमाणे पीएच.डी.साठी विचार केला जाऊ शकतो. मूलभूत विज्ञान आणि मानव्यशास्त्रामधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचादेखील पीएच.डी.साठी विचार केला जाऊ शकतो, पण त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेत (जेआरएफ) उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा – वय २८ वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे.

अधिक माहितीसाठी संपर्क : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी तिरुअनंतपुरम, केरळ,. www.iist.ac.in

 

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 4:36 am

Categories: Jobs   Tags:

Next Page »

© 2010 PupuTupu.in