भांडुपमध्ये गँगवार; एकाची हत्या

मुंबईतील भांडुप येथे सोमवारी रात्री संतोष चव्हाण या गुंडाची अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. संतोष चव्हाण हा भांडुप पश्चिमेकडील साई हिल रोड परिसरात जुगाराचा अड्डा चालवत होता.

रात्री अकराच्या सुमारास काही तरुण चव्हाणच्या जुगाराच्या अड्ड्यावर पोहोचले. तिथे त्यांनी चव्हाणवर पाच गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर जमाल नावाचा एक इसम जखमी झाला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. जुगारातील वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा संशय असून अधिक तपास सुरू आहे.