पर्समध्ये दडलंय काय? What is in girls purse?

मुलींच्या पर्समध्ये काय-काय असतं या विषयीची उत्सुकता समस्त

मुलांमध्ये असते. ते मुलांना कळालं, तर ते नक्की चक्रावून जातील यात शंका नाही. टाकूयात एक नजर मुलींच्या पर्समध्ये. तसंच, त्यातील वस्तू बाळगणं का महत्त्वाचं असतं, हेही जाणून घेऊया.

purse

*मेकअप सामान  Makeup things

पावडर, काजळ, आयशॅडो, लिप-बाम, फाउंडेशन, लिपग्लॉस, आयलायनर अशी यादी केली, तर संपता संपणार नाही. दर दोन-तीन तासांनी टचअप करण्यासाठी या सगळ्याची मुलींना गरज पडतेच.  Powder, Eye-shadow, Lip-balm, Lip-gloss, Eye liner

*औषध  Medicine

डोकेदुखी, सर्दी, चक्कर, पित्त अशा त्रासांसाठी लागणाऱ्या गोळ्या हमखास पर्समध्ये असतात. बऱ्याचदा त्या आईनं जबरदस्ती ठेवायला लावल्यानंही बाळगल्या जातात. for Headache, Cold

*पेपर-चिली स्प्रे  Pepper Chilly Spray

हल्ली ज्या काही घटना घडताहेत, त्यामुळे असे स्प्रे बरोबर ठेवणं ही गरजच बनली आहे.

*स्टेपलर, पिना, पंचिंग मशिन  Stepler, Pins, Punching Machine

वर दिलेल्या गोष्टी ठीक आहेत; पण हे जरा अतीच आहे.

*नोटपॅड, पेन, पेन्सिल  Notepad, Pen, Pencil

कुठंही काहीही नोट करून घेण्यासाठी अत्यंत सोप्प पडतं म्हणून ही स्टेशनरी मुली सोबत ठेवतात.

*टाचणी, सुई, पिन, दाभण , Tachni, Sui, Dabhan

टाचणी, सुई, पिन एकवेळ चालून जाईल; पण दाभण तेही पर्समध्ये? यावर एका मुलीने सांगितलं, की बसमधून प्रवास करताना स्वरक्षणासाठी हल्ली लोक सुई, टाचणीला वगैरे जुमानत नाहीत; म्हणून दाभण!

*लवंग, वेलची, बडीशेप, खडीसाखर  Lavang, Velachi, Badishep, Khadisakhar

खाल्यानंतर किंवा बरं वाटत नसेल, तर तोंडाला चव येण्यासाठी लवंग, वेलची, बडीशेप उत्तम.

*मेणबत्ती, काडेपेटी , Candle, Matchbox

एकदम अनोळखी ठिकाणी लाइट वगैरे गेले, तर पंचाईत नको म्हणून कायम या गोष्टी बरोबर असाव्यात, असं बऱ्याच आई सांगतात.

*ता. क: हा लेख वाचून झाल्यावर आम्हाला नाही वाटत कोणी मैत्रिणीला वा बायकोला परत विचारेल, की तुम्ही पर्समध्ये काय आणता ते?