Matchbox collection

 

31_01_2015_106_016

मी सैन्यदलातून इएमई कोअरमधून १९७८ मध्ये निवृत्त झालो. निवृत्त झाल्यावर सध्याच्या टाटा मोटर्स (आधीची टेल्को) या कंपनीत नोकरीला लागलो. मोटार मॅकेनिक आणि ड्रायव्हिंग याचा अनुभव असल्यानं कंपनीच्या इआरसी विभागात टेस्ट ड्रायव्हर म्हणून बदली झाली. तिथं पंधरा वर्ष काम करताना काड्यापेट्या जमवण्याचा छंद लागला. १९९८ मध्ये माझ्याकडे फक्त तीन हजार काडेपेट्यांचा संग्रह होता. पुढं हा छंद ‘वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे वाढतच गेला. आजमितीस पाच मोठे अल्बम तयार झाले आहेत. त्यात पंधरा हजार काडेपेट्या चिटकवून मी माझा छंद मोठा केला आहे.

या छंदाची टेल्को परिवार मासिकानं दखल घेतली. या छंदाचं आर्टिकल छापून टेल्को कामगारांमध्ये माझी ओळख ‘काडेपेट्या संग्राहक’ म्हणून करून दिली. कंपनीतून निवृत्त झाल्यावरही मी माझा छंद आजतागायत जोपासला आहे. निवृत्तीनंतर वेळ घालवण्याचं साधन मिळाल्यानं, काय करायचं याची चिंता वाटत नाही. अशा प्रकारच्या संग्राहकांना माझं सांगणं आहे, की माझ्या जवळील चांगल्या स्थितीतल्या पण माझ्या उपयोगी नसलेल्या हजारो काडेपेट्या विनामुल्य घेऊन जा, आणि तुमचा संग्रह वाढवा.