wonders of CES

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो

 

तंत्रज्ञानात दिवसेंदिवस अगदी मिनिटागणिक बदल घडत असतात. तरीही जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राला नवीन वर्षांच्या आगमनाची प्रतीक्षा असते. याचं कारण अमेरिकेतल्या लास वेगासमध्ये होणाऱ्या ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो'(सीईएस) या प्रदर्शनाची. नव्या वर्षांत किंवा नजीकच्या काळात बाजारात येणाऱ्या नव्या गॅझेट्स किंवा उत्पादनांची वर्दी देणारे हे प्रदर्शन नेहमीच नवलाईने भारलेले असते. यंदाचे वर्षही याला अपवाद नाही.
गेल्या वर्षी याच प्रदर्शनातून ‘फोर के’ टीव्हीने बाजारपेठेत धमाकेदार एन्ट्री केली होती, तर स्मार्ट होम ही संकल्पनाही याच प्रदर्शनात पहिल्यांदा मांडली गेली. अगदी ड्रोनपासून वेअरेबल गॅझेटपर्यंतच्या अनेक नवतंत्रज्ञानाला जगाच्या व्यासपीठावर आणले ते सीईएसने. यंदा हे प्रदर्शन ६ ते ९ जानेवारीदरम्यान भरत आहे. जगभरातील तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपन्या येथे आपली उत्पादने मांडण्याची तयारी करत आहेत. तर प्रदर्शनातील नवलाई पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक शिकागोत दाखल झाले आहेत. यंदा या प्रदर्शनात नवीन किंवा अचाट काय पाहायला मिळेल, हे आताच सांगणं जरा कठीण आहे. मात्र, हा लेख छापून येईपर्यंत अनेक कंपन्यांनी ‘सीईएस’मधील आपल्या योजना, उत्पादनांची एक झलक दाखवली आहे. त्यावर दृष्टिक्षेप टाकल्यास येत्या काळात मानवी जीवनात आणखी कोणते तंत्रज्ञान येऊ घातले आहे, याचा अंदाज येईल.

Untitled-1बेल्किनची ‘स्मार्ट होम’ उत्पादने घरातील स्मार्ट उपकरणांना नियंत्रित करणारी ‘इकोसिस्टिम’ विकसित करणाऱ्या बेल्किनने यामध्ये यंदा आणखी चार उत्पादनांची भर पाडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये वायरलेस मोशन सेन्सर, अलार्म सेन्सर, कीचेन आणि दारेखिडक्यांना बसवण्याच्या सेन्सरचा समावेश आहे. याशिवाय घरातील पाणी आणि वीज यांच्या वापरावर लक्ष ठेवणारे ‘एको’ हे उत्पादनही बेल्किनने जाहीर केले आहे. मात्र, ते २०१५च्या शेवटच्या महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता आहे.

Untitled-1एचपीचे वक्राकार मॉनिटर
गेल्या वर्षी सीईएसमध्ये ‘फोर के’ आणि ‘कव्र्हड’ टीव्हीची जोरदार चर्चा होती. बाजारातही या टीव्ही सेट्सनी ग्राहकांचे डोळे दीपून टाकले. त्यात आता ‘५के’ मॉनिटरची भर पडली आहे. एचपी कंपनीने सोमवारी फोर के श्रेणीतील दोन मॉनिटर सादर करतानाच त्याहूनही दर्जेदार अशा ‘पाच के’ श्रेणीतला एक मॉनिटर ‘सीईएस’मध्ये मांडला. त्यापैकी झेड२४एस आणि झेड२७एस फोर के मॉनिटर अनुक्रमे २३.५ इंच आणि २७ इंच आकाराचे आहेत. या दोन्हींमधील वैशिष्टय़े जवळपास सारखीच आहेत. दोन्ही मॉनिटरना ३.० श्रेणीतील चार यूएसबी पोर्ट पुरवण्यात आले असून एचडीएमआय पोर्टही दिला गेला आहे. यापैकी झेड२७एस याच महिन्याच्या अखेरीपर्यंत ७४९ डॉलर किमतीत महत्त्वाच्या बाजारांत उपलब्ध होईल. तर ५४९ डॉलर किमतीच्या झेड२४एसला बाजारात यायला एप्रिल उजाडेल. एचपीने आणलेला ‘५ के’ मॉनिटर २७ इंचाचा असून त्यातील दृश्यात्मकता फोर केपेक्षाही अधिक सुस्पष्ट आहे. या मॉनिटरची अंदाजे किंमत एक हजार डॉलर इतकी असेल.

Untitled-1वेअरेबल गॅझेट्स
गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही वेअरेबल अर्थात परिधानक्षम गॅझेट्स हे ‘सीईएस’मधील महत्त्वाचे आकर्षण केंद्र असणार आहे. स्मार्ट वॉच आणि तत्सम उपकरणांनी गेले वर्ष गाजवल्यानंतर आता यंदा आणखी काही गॅझेट्स आपल्या अंगाखांद्यावर खेळण्याची शक्यता आहे. यामध्ये स्मार्ट कपडय़ांपासून बोटांतल्या अंगठीपर्यंतच्या अनेक गॅझेट्सचा समावेश असू शकतो. आतापर्यंत कोणत्याही मोठय़ा कंपनीने आपली उत्पादने जाहीर केलेली नाहीत. मात्र, विथिंग्जने ‘सेमी स्मार्टवॉच’ची घोषणा करत या स्पर्धेत पहिले पाऊल टाकले आहे. व्यक्तिच्या हालचाली, झोप यांची नोंद ठेवणारे हे स्मार्टवॉच सध्याच्या बडय़ा स्मार्टवॉचच्या तुलनेत तंत्रज्ञानाने बरेच मागे असले तरी त्याची किंमतही त्यांच्या मानाने कमी, १५० डॉलर इतकी आहे. अॅपलचे आय वॉच यावर्षी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, त्याबाबत ‘सीईएस’मध्ये घोषणा होणे निश्चित नाही.
यावर्षी ‘रिंग’ने आतापासूनच अनेकांची मने जिंकली आहेत. केवळ बोटाच्या हालचालीवर घरातील दिवे चालूबंद करू देणारी किंवा स्मार्टफोनवरील क्रिया करणारी ‘रिंग’ आता नव्या रूपात ‘सीईएस’मध्ये मांडण्यात आली आहे. बोटात घालायच्या या अंगठीला स्मार्टफोनशी कनेक्ट करणारे एक अॅप इन्स्टॉल केल्यानंतर या अंगठीच्या सा’ाने ‘स्मार्ट’ क्रिया करता येतात. विशेष म्हणजे, ही ‘रिंग’ अवघ्या १३० डॉलर किमतीची आहे.

Untitled-1‘फोर के’ची चलती
सीईएसमध्ये यंदाही ‘फोर के’ची चलती असेल, अशी शक्यता आहे. कारण मोठमोठय़ा टीव्ही कंपन्यांपाठोपाठ स्मार्ट टीव्ही क्षेत्रातील ‘रोकू टीव्ही’नेही ‘फोर के’ दर्जाचा टीव्ही दाखल करण्याचे जाहीर केले आहे. यासाठी ‘रोकू’ने हायर आणि टीसीएल या कंपन्यांशी करारही केल्याचे वृत्त आहे. या  टीव्हीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच त्यातील वैशिष्टय़ेही उघड करण्यात आलेली नाहीत. मात्र, ३२ ते ६५ इंच आकारातील हे ‘स्मार्ट टीव्ही’ या वर्षांत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.