Amit Raj Thakaray in politics

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmailby feather

अमित राज ठाकरे सक्रिय राजकारणात

अमित राज ठाकरे सक्रिय राजकारणात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सक्रीय राजकारणात येण्याचे संकेत मिळतायेत. अमित ठाकरे हे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेण्यासाठी मुंबई महापालिकेत पोहोचले. या भेटीत ते आयुक्तांपुढे आपल्या एका संकल्पनेचं सादरीकरण करणार आहेत. 

मुंबईतील मैदानावर असलेले रेन ट्रीज नष्ट होत असल्याचं अमित यांच्या निदर्शनास आलंय. हे रेन ट्रीज वाचवण्यासाठी अमित ठाकरेंनी काही उपाययोजना सुचवल्या असून, ती संकल्पना ते आयुक्तांसमोर मांडणार आहेत. अमित ठाकरे आपले वडिल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविना स्वतंत्रपणे पहिल्यांदाच महापालिकेत येत असल्यानं प्रचंड उत्सुकता आहे. 

अमित हे आता वेगानं पक्षाच्या राजकारणात सक्रिय होत असल्याचं दिसून येतंय. याआधी त्यांचा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारात सहभाग असायचा. अलिकडे ते राज ठाकरेंसोबत पक्षाच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ लागलेत. मात्र मुख्य संघटनेत काम करणार की विद्यार्थी संघटनेत याबाबत उत्सुकता आहे. आज ते महापालिकेतील पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांशीही संवाद साधतील, अशी अपेक्षा. 

याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांचे चिरंजीव आदित्य यांच्या रुपानं ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी सक्रिय झाली आहे. बाळासाहेब, राज, उद्धव आणि आदित्यनंतर आता सक्रीय राजकारणात सहभागी होणारा अमित पाचवा ठाकरे असणार आहे.