Dhoni Selected name “Jeeva” for her newly born daughter

धोनीनं जाहीर केलं आपल्या चिमुकलीचं नाव…

धोनीनं जाहीर केलं आपल्या चिमुकलीचं नाव...

भारतीय क्रिकेट कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी धोनी यांनी आपल्या नवजात मुलीच्या नावाच्या रहस्यावरचा पडदा उघडलाय. 

जगभर पसरलेले धोनीचे फॅन्स त्याच्या लाडक्या चिमुकलीचं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. त्यांची उत्सुकता जास्त ताणून न धरता धोनीनं आपल्या चिमुकलीचं नाव जाहीर केलंय. 

धोनीनं आपल्या चिमुकलीचं नाव ‘जीवा’ असं ठेवलंय. जीवा हा एक पारसी शब्द आहे. याचा अर्थ आहे सुंदर, चमकदार, कुशाग्र आणि प्रकाश… 

आपल्या चिमुकलीचं नाव साक्षी धोनीनं ट्विट करून जाहीर केलंय. ‘या सुंदर जगात तुझं स्वागत आहे जीवा! मम्मा आणि पापा तुझ्यावर खूप प्रेम करतात. शुभेच्छांसाठी आभारी आहे, #बेबी जीवा’!, असं साक्षीनं ट्विट केलंय.