Om Namoji Aadya – D. K. Soman

ओम नमोजी आद्या

खगोलशास्त्रज्ञ आणि पंचागकर्ते दा. कृ. सोमण.

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना पंचमहाभूतं म्हणून ओळखतो. ही पाच शक्तीस्थानं आहेत. या पंचमहाशक्तींमध्येच श्रीगणेशाचं वास्तव्य आहे. या निसर्गाची उपासना करणं, पर्यावरण संवर्धन करणं म्हणजेच श्रीगणेशाची उपासना करणं होय. सर्वांच्या लाडक्या गणपती देवतेची षोडशोपचार पूजा कशी करावी याबद्दल सांगताहेत खगोलशास्त्रज्ञ आणि पंचागकर्ते दा. कृ. सोमण.

….

श्रीगणेश म्हणजे मूतिर्मंत ओमकार आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात –

”अकार चरणयुगुल।

उकार उदर विशाल।

मकार महामंडल।

मस्तकाकरे।।

हे तिन्ही एकवटले।

तेथे शब्दब्रह्मा कवळले।

ते मिया गुरूकृपा नमिले।

आदिबीज।।”

भगवद्गीतेत ओमकाराला ‘एकाक्षरी ब्रह्मा’ संबोधलं आहे. ‘ओम’ हा ध्वनी सर्व ब्रह्माांडाला व्यापून राहिला आहे. नादयोगामध्ये हा ध्वनी अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी असल्याचं म्हटलंय. मांडुक्य उपनिषदात ओमकार हा एकाक्षरी महामंत्र असल्याचं म्हटलं आहे. स्वामी विवेकानंदांनी ओमकार म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर असं म्हटलंय. ओमकाराचा जप हीच खरी उपासना होय. ओम हे ब्रह्मा असून विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय त्याच्याच आश्रयाने सुरू असतात, असं तैत्तिरीय उपनिषदात म्हटलं आहे. अ + उ + म् +ॅ मिळून ओमकार बनतो. ओमकाराचे हे चार विभाग जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या चार अवस्थांचं तसंच विश्व, तैजस, प्राज्ञ आणि आत्मा अशा चार आत्मस्वरूपाचे निदर्शक म्हणून मानले गेले आहेत. तसंच ‘अ’कार विष्णू, ‘उ’कार महेश आणि ‘म’कार हा ब्रह्मा अशा तिन्ही देवतांचा ओमकारात समावेश केला आहे. ‘अ’कार विश्वाची व्याप्ती करतो. ‘उ’कार तेजाची आणि ‘म’कार ज्ञानाची व्याप्ती करतो. ‘ओम’लाच ‘प्रणव’ असंही म्हणतात.

पंचमहाशक्ती

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना आपण पंचमहाभूतं म्हणून ओळखतो. ही पाच शक्तिस्थानं आहेत. या पंचमहाशक्तींमध्येच श्रीगणेशाचं वास्तव्य आहे. या निसर्गाची उपासना म्हणजेच श्रीगणेश उपासना होय.

‘त्वं भूमि: रापोह्यनलो ह्यनिलोनभ:’

‘त्वं ब्रह्माात्वं विष्णुस्त्वं रूदस्त्वं इंदस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं चंदमास्त्वं ब्रह्माभूर्भुव: स्वरोम’ असं गजकऋषींनी अथर्वशीर्षस्तोत्रात म्हटलंय.

पंचमहाशक्ती म्हणजे साक्षात श्रीगणपती. म्हणूनच त्याची उपासना करणं म्हणजे या महाशक्तींची ओळख करणं. पर्यावरणाकडे लक्ष देणं होय.

१) पृथ्वी – पृथ्वी पंचमहाशक्तींमधली पहिली शक्ती आहे. प्रथ् म्हणजे विस्तार पावणं यावरून हा शब्द बनला आहे.

‘प्रथवे विस्तार याति इति’ यावरून जी विस्तार पावते ती पृथ्वी अशी व्याख्या करण्यात आली आहे. गंध हा पृथ्वीचा गुण आहे. ऋग्वेदात म्हटलं आहे-

स्योना पृथिवि भवा नृक्षरा निवेशनी।

यच्छा: न: शर्म सप्रथ:।।

‘हे पृथ्वी, तू आम्हाला प्रसन्न हो. तुझ्यापासून कोणालाच उपसर्ग पोचत नाही. तू आपल्या पृष्ठभागावर सर्वांचाच समावेश करतेस. तेव्हा तू आम्हास सौख्यातिशय प्राप्त करून दे.’ अथर्ववेदात पृथ्वीचे धनदात्री, दानकतीर् आणि देवस्वरूप असे वर्णन केलं आहे.

पृथ्वीमध्येच श्रीगणेश आहे. म्हणूनच भादपद शुक्ल चतुथीर्च्या दिवशी पाथिर्व म्हणजे पृथ्वीच्याच मातीची गणेशमूतीर् पूजावी असं सांगितलंय. पृथ्वी सुमारे ४.५४ अब्ज वर्षांपूवीर् निर्माण झाली असावी. पृथ्वी ३६५.२५६३६६ दिवसांत सूर्याभोवती दर सेकंदाला २९.७८३ कि.मी. या वेगाने एक प्रदक्षिणा पूर्ण करते. तसंच स्वत:भोवती २३ तास ५६ मिनिटं ४.०९८९०३६९१ सेकंदात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वीचा विषुववृत्तावरचा व्यास १२,७५६.२ कि.मी. असून धृवीय व्यास १२७१३.६ कि.मी. आहे. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला लोकसंख्या वाढ, प्रदूषण, अण्वस्त्रं, एड्स यासारखे आजार, ओझोनला छिदं पडणं, वन्यप्राणी जीवन नष्ट होणं, जमिनीची धूप, कचरा, बेसुमार जंगलतोड, खनिज संपत्ती नष्ट होणं इत्यादी धोके आहेत. म्हणून पर्यावरणाकडे लक्ष देणं म्हणजेच श्रीगणेश उपासना होणार आहे.

२) आप (पाणी)- ‘आप’ म्हणजे जल, पाणी, ही वैदिक देवता आहे. जल आणि नदी यांना वैदिक आर्य ‘आप’ या नावाने ओळखत. ऋग्वेदात ‘आप’ देवतेबद्दल चार सूक्तंआहेत. इंद आपल्या वज्राने पाण्याला वाट करून देतो. तिथूनच पाणी वाहतं. आप हे शुद्ध, मधुर आणि निदोर्ष आहे. पाणी हे रोगनिवारक असून त्यामुळेच पृथ्वीवरची जीवसृष्टी निर्माण झाली, असं ऋग्वेदात म्हटलं आहे. पृथ्वीचा ७१ टक्के पृष्ठभाग हा सागराने व्यापलेला आहे.

आपो ज्योती रसोह्यमृतं ब्रह्मा भू:र्भुव:स्वरोम्।

या वचनाप्रमाणे वेदांमध्ये आप शब्दाचा प्रयोग ज्योती, रस, अमृत, ब्रह्मा, भूर्र्भव:स्व आणि ओम् या अथीर् होतो. पंचमहाभूतांमधली ही महत्त्वाची शक्ती आहे. त्यामध्ये श्रीगणेश आहेत. म्हणूनच गणेश मूतीर्चं विसर्जन पाण्यातच केलं जातं. ‘जलति जीवयति लोकानिति’ म्हणजेच लोकांना जगवते ते जल. श्रीगणेशाचा वास पाण्यात आहे. आधुनिक वैज्ञानिक भाषेत पाण्याला ।।२ह्र म्हणून ओळखलं जातं. शून्य अंश तापमानात पाण्याचं बर्फात रूपांतर होते तर ९९.९७४ अंश सेल्सिअस तापमानात पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. भारतात लहान मोठ्या मिळून दोन हजार नद्या आहेत. त्यापैकी सिंधू(२९००कि.मी.), चिनाब (९६०कि.मी.), रावी (७२७कि.मी.), बियास(४६४ कि.मी.), सतलज (१३६० कि.मी.), गंगा (२५१० कि.मी.), गोमती (८०० कि.मी.), गंडक (६७५ कि.मी.), कोसी (५९० कि.मी.), दामोदर (६२५ कि.मी.), यमुना (१४३५ कि.मी.), ब्रह्मापुत्रा (२९०० कि.मी.), साबरमती (४१५ कि.मी.), मही (५३३ कि.मी.), चंबळ (१०४० कि.मी.), नर्मदा (१३१० कि.मी.), तापी (७०२ कि.मी.), महा (८५८ कि.मी.), गोदावरी (१४९८ कि.मी.), कृष्णा (१२८० कि.मी.), भीमा (८६७ कि.मी.), तुंगभदा (६४० कि.मी.), कावेरी (७६० कि.मी.) या नद्या प्रसिद्ध आहेत. दुदैर्वाने या नद्यांचं जतन केलं जात नाही. निर्माल्य, कचरा, कारखान्यांचं सांडपाणी यामुळे नद्यातलं पाणी अस्वच्छ होतं. पर्यावरणाकडे लक्ष दिलं जात नाही. भारतामध्ये जलप्रदूषण ही मोठी समस्या आहे. जलप्रदूषण न होऊ देणं हीच खरी गणेशाची उपासना आहे.

३) तेज (अग्नी, सूर्य)- तेज ही पंचमहाभूतांमधली महाशक्ती आहे. श्रीगणेशाचं ते एक रूप आहे ‘उष्णस्पर्शवत्तेज’ म्हणजे उष्ण, स्पर्श हा तेजाचा असाधारण धर्म आहे. शब्द, स्पर्श आणि सूर्य हे तेजाचे तीन गुण आहेत. तेज हे जगताचं मूलतत्त्व मानलं गेलं जातं. न्यायशास्त्रात तेज शुभ्र चकचकीत म्हटलंय. पण छांदोग्य उपनिषदात तेजाचा रंग तांबडा असल्याचं म्हटलं आहे. तेज हे ब्रह्मााचं प्रतीक आहे. अग्नी ही वैदिक देवता आहे. विस्तव हे अग्नीचं पाथिर्व रुप. ‘अङ्गति ऊर्ध्वं गच्छति इति’ म्हणजे वर जातो तो अग्नी. द्यु, अंतरिक्ष आणि पृथ्वी ही अग्नीची प्रमुख जन्मस्थानं आहेत. अग्नीला अर्पण केलेलं दव्य अधिक पवित्र होऊन देवांना पोहोचतं, या समजुतीमुळे यज्ञसंस्था उदय पावली.

सूर्य पृथ्वीपासून सरासरी १४९५९८००० किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य सुमारे पाच अब्ज वर्षांपूवीर् निर्माण झाला असावा. सूर्यात हायड्रोजन आहे. त्याचं हेलियममध्ये रूपांतर होत असतं. सूर्याच्या पृष्ठभागावर ५५०० अंश सेल्सिअस तापमान आहे. सूर्य आकाशगंगेमधल्या केंदापासून २४००० ते २६००० प्रकाशवर्षं अंतरावर आहे. तो २२.५ ते २५ कोटी वर्षांमध्ये एका सेकंदाला २५१ किलोमीटर या वेगाने एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्यावरची हायड्रोजनची अणुभट्टी अजून पाच अब्ज वर्षं चालू राहणार आहे. नंतर त्याचं ‘श्वेतखुजा’मध्ये रूपांतर होईल. पृथ्वीवासियांनी सौरऊजेर्चा जास्तीत जास्त वापर करायला हवा.

४) वायू – वायू एक वैदिक देवता आहे. वायूची उत्पत्ती विश्वपुरुषाच्या श्वासातून झाली, असं ऋग्वेदात म्हटलं आहे. वायू सुंदर, मनोगती आणि सहस्त्र नेत्रांचा आहे असंही ऋग्वेदात म्हटलं आहे. वायूमुळे पर्जन्याचं आगमन होतं. पुराणात वायूचा जन्म आकाशापासून झाल्याचं म्हटलं आहे. ‘स्पर्श’ हा वायूचा गुण आहे. ‘रूपरहित: स्पर्शवान वायु:’ म्हणजे ज्याला रूप नाही पण स्पर्श आहे तो वायू होय. शरीर प्राणवायूमुळे जिवंत राहतं. वायूशक्तीमध्ये श्रीगणेश आहे. आधुनिक काळात वायूपासून पवनचक्कीद्वारे विद्युतनिमिर्ती केली जाते. वायू हे एक चैतन्य आहे.

५) आकाश – आकाशाची उंची अमर्याद आहे. १३.७ अब्ज वर्षांपूवीर् हे विश्व एका महास्फोटातून निर्माण झालं. त्यावेळी वेळ (ञ्जढ्ढरूश्व), वस्तू (रून्ञ्जञ्जश्वक्र) आणि आकाश पोकळीची (स्क्कन्ष्टश्व) निमिर्ती झाली. पृथ्वीसभोतालचं वातावरण ६० ते ८० किलोमीटरपर्यंत आहे. या उंचीला ‘मिसॉस्फिअर’ म्हणतात. उल्कावर्षाव याच उंचीवर होतो. अवकाश संशोधनासाठी जे फुगे पाठवतात ते २० ते ४० किलोमीटर उंचीपर्यंत जातात. काँकर्ड विमानं या उंचीवर उड्डाण करतात. ८० ते १२० किलोमीटर उंचीपर्यंत ‘ऑरा’ म्हणजे ‘ध्रुवीय प्रकाश’ दिसतो. अवकाशयान २६० किलोमीटर उंचीवर जातं. कृत्रिम उपग्रह ३८० किलोमीटर उंचीवरही ठेवली जातात. भूस्थिर उपग्रह ३६ हजार किलोमीटर उंचीवर ठेवावा लागतो. असं हे अवकाश… पंचमहाभूतातली एक महाशक्ती. विशालकाय श्रीगणेश या आकाशातही आहे. मूतीर्मधल्या गणेशरूपाबरोबरच पंचमहाशक्तींमधलं गणेशरूप ओळखणं, पंचमहाशक्तीचं महत्त्व जाणून पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध होणं हीच मोठी गणेश उपासना असेल.

देवपूजेचा इतिहास

देवपूजा म्हणजे एखाद्या देवतेला श्रद्धायुक्त अंत:करणाने विधियुक्त केलेलं उपचार समर्पण.

‘तत्र पूजा नाम देवतोद्देशेन दव्य त्यागात्मकत्वाद्याग एव’

देवतेला उद्देशून दव्यत्याग केला जात असल्यामुळे पूजा म्हणजे यागच होय, अशी पूजेची व्याख्या केली जाते.

पूजा ही आर्य संस्कृतीला दविड संस्कृतीकडून मिळालेली देणगी आहे. आर्यांना ‘यजन’ म्हणजे यज्ञयाग माहीत होतं. परंतु ‘पूजन’ माहीत नव्हतं. वैदिक आर्य इंदादी देवांना आणि पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांना प्रसन्न करून घेण्यासाठी समिधा, यव, पुरोडाश इत्यादी वस्तूंचं अग्निमध्ये हवन करत. परंतु या यज्ञ यागामध्ये पुष्प, पत्र, अक्षता, चंदन, धूप, दीप इत्यादी वस्तूंना मुळीच स्थान नव्हतं. ऋग्वेदामध्ये कुठेही ‘पूजा’ हा शब्द आढळत नाही. यासंबंधी सुनीतीकुमार चटजीर् यांनी अधिक संशोधन केलं आहे. त्यानुसार ‘पूजा’ हा शब्द आर्य भाषेतला नसून तो दविड भाषेतला आहे. दविडांमध्ये फुलांनी देवाधर्माचे कृत्य संपन्न करणं म्हणजे ‘पूजा’ होय. दविडांमध्ये ‘पू’चा अर्थ फूल असा आहे, आणि करणे या अथीर् चेय, होय, गेय, जेय हे धातू रूढ आहेत. पू अधिक गेय् किंवा पू अधिक जेय म्हणजे पुष्पकर्म करणं असा होतो. त्यावरूनच वेदोत्तर संस्कृत भाषेमध्ये पूज् हा धातू आणि पूजा हे नाम आलं असावं. आर्य आणि दविड यांनी एकमेकांच्या ज्या धामिर्क गोष्टी स्वीकारल्या त्यामध्ये दविडी लोकांची पूजापद्धती आर्यांनी स्वीकारली असावी.

ऋग्वेदात ‘पूजा’ हा शब्द कुठेही आढळत नाही. महाभारतकाळी मात्र पूजेला यज्ञकर्माबरोबरच प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात- ‘मी सर्व यज्ञांचा भोक्ता आहे. पण त्याबरोबर पत्र, पुष्प, फल तोय हे पूजोपचारही मला आवडतात.’ पुराणांनी पूजेचे माहात्म्य आणि तपशील या दोन्ही गोष्टी वाढवल्या.

बौद्ध धर्माच्या उत्कर्षकाळात यज्ञसंस्था कमी होत गेली आणि त्या जागी देवपूजा अधिक रूढ होऊ लागली. यज्ञयाग पद्धत जास्त क्लीष्ट होती, तर पूजापद्धती जास्त सुलभ आणि कलापूर्ण होती. यज्ञयाग हे विशिष्ट लोकांनाच माहीत होते. परंतु पूजा अबालवृद्ध, स्त्री, पुरूष अशा कोणालाही करता येत होती. त्यानंतर स्मृतिकाळात तर पूजा हे प्रत्येकाचं कर्तव्यच मानलं गेलं. यज्ञयागातल्या देवदेवता अमूर्त होत्या. पण देवपूजेत प्रत्यक्ष मूतीर् असल्याने पूजकाला आधिक समाधान मिळू लागलं. पूजाही केवळ मूतीर्ंचीच राहिली नाही. गुरू, आचार्य, माता, पिता, अतिथी, संत, महात्मे इत्यादींचाही पूजेने सन्मान केला जाऊ लागला.

षोडशोपचार पूजा

त्यानंतर देवपूजेमध्ये षोडशोपचार पूजेचं महत्व आलं.

१. आवाहन

२. आसन

३. पाद्य

४. अर्घ्य

५. आचमन

६. स्नान

७. वस्त्र

८. यज्ञोपवीत

९. गंध

१०. पुष्प

११. धूप

१२. दीप

१३. नैवेद्य

१४. नमस्कार

१५. प्रदक्षिणा

आणि १६. मंत्रपुष्प

हे षोडशोपचार पूजेमध्ये अर्पण केलं जाऊ लागलं. या उपचारांच्या बाबतीतही विकल्प सांगितलेले आहेत. त्यामुळे पूजापद्धती अधिक सुलभ झाली. या उपचारांच्या मागेही एक संकल्पना होती.

पुष्पाभावे फलं शस्तं फलाभावे तु पल्लवम्।

पल्लवस्थाप्यभावे तु सलिलं ग्राह्यमिष्यते।

पुष्पाद्यसम्भवे देवं पूजयेत्सिततण्डुलै:।।

फूल न मिळाल्यास फळ, ते न मिळाल्यास पाने, तीही न मिळाल्यास पाणी आणि तेही न मिळाल्यास शुभ्र म्हणजे धुतलेल्या तांदळांनी म्हणजेच अक्षतानी देवांची पूजा करावी.

१) आवाहन – अक्षता वाहून देवाला आवाहन केलं जातं.

२) आसन – हा उपचार समपिर्त करताना देवतेच्या बैठकीखाली अक्षता किंवा पाच फुले ठेवतात. विष्णूच्या आसनाखली तुळशीची पानं ठेवतात.

३) पाद्य – पाद्य उपचार मूतीर्च्या पायांवर फुलाने पाणी शिंपडून अर्पण केला जातो.

४) अर्घ्य – गंधमिश्रित पाणी फुलाने मूतीर्वर शिंपडतात. अर्घ्यासाठी पाण्यात दही, अक्षता, कुशाग्रे, दूध, दूर्वा, मध, यव आणि पांढरी मोहरीही घालतात.

५) आचमन – देवाला पिण्यासाठी आणि चूळ भरण्यासाठी पाणी देण्यालाच ‘आचमन’ म्हणतात. त्यासाठी पळीत पाणी घेऊन फुलाने चार वेळा मूतीर्वर शिंपडतात. या पाण्यात लवंग, वेलदोडा, वाळा, कंकोळही घालतात.

६) स्नान – यासाठी पळीत पाणी घेऊन दूर्वांनी किंवा फुलांनी ते मूतीर्च्या अंगावर शिंपडतात. तेल, उटणे इत्यादीनी अभ्यंग घालून उष्णोदकाने स्नान घालतात. पंचामृत स्नानासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा वापर करतात.

७) वस्त्र – कापसाचं वस्त्र देवाला अर्पण करतात.

८) यज्ञोपवीत – पुरुष देवतांना यज्ञोपवीत (जानवे) अर्पण करतात.

९) गंध – देवाला चंदन, कस्तुरी, कापूर, कुंकू आणि जायफळ लेप लावतात.

१०) पुष्प – गणपतीला लाल पुष्प प्रिय आहे. विष्णूला चंपक, मालती, कुंद व जाईची फुले आवडतात. शंकराला रुई, करवीर, दोण, कुश, धोतरा, नीलकमल प्रिय आहे.

११) धूप – सुगंधी व मन प्रसन्न करणारा असावा. धूपासाठी चंदन, गुग्गुळ, राळ, जटामांसी इत्यादी सुवासिक पदार्थ वापरतात.

१२) दीप – तुपाचा व तिळाच्या तेलाचा दिवा प्रशस्त आहे. निरांजनात तूप आणि फुलवात घालून ते प्रज्वलित करून ओवाळतात.

१३) नैवेद्य – आपण जे अन्न खातो ते देवाला नैवेद्यासाठी चालतं. नैवेद्य दाखवताना खाली चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवतात. ‘प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्माणे स्वाहा’ असं म्हणून ‘मध्ये पानीय’ म्हणून नंतर प्राणाय स्वाहा इत्यादी मंत्र म्हणतात.

१४) नमस्कार – देवापुढे नम्र होऊन साष्टांग नमस्कार घालतात.

१५) प्रदक्षिणा – देवाभोवती प्रदक्षिणा घालतात. शक्य नसेल तर स्वत:भोवती फिरवून प्रदक्षिणा घालतात.

१६) मंत्रपुष्प – मंत्रपुष्प अर्पण करतात.

………..

चौकट

देवतांची वाहनं

शंकराचं वाहन नंदी, विष्णूचं गरूड, देवीचं सिंह, सरस्वतीचं मोर किंवा हंस, गणपतीचं उंदीर अशी वाहनं सांगण्यात आली आहेत. या देवतांची ही वाहनं का आहेत, त्यांच्या कथाही सांगण्यात आलेल्या आहेत.

गणेशप्रिय पत्री :

१) मधुमालती (संस्कृत नाव- मालती): या वनस्पतीची वेल असते. या वेलीत टॅनिन असतं. तसंच त्यात हिप्टॅजीन हे ग्लुकोसाइड आढळतं. संधिवात, खरुज यावर हे औषधी आहे. हे कृमिनाशकही आहे.

२) माका – (संस्कृत नाव- ‘भृजंगराज’): माका जमिनीशी सरपट वाढणारी छोटी वनस्पती. माका कडू, उष्ण, डोळे आणि दात यांना चांगली तसंच केशरंजक असतो. कफ, वायू, खोकला, दमा, कृमी, हृद्रोग, विष, डोकेदुखी इत्यादींवर माका उपयुक्त असतो.

३) बेल- (संस्कृत नाव-बिल्व) आयुवेर्दात आव, बहिरेपणा, घसादुखी, अतिसार, आम्लपित्त, ज्वर, तोंडात फोड आल्यास बेल उपयुक्त असल्याचं सांगितलं आहे.

४) पांढऱ्या दुर्वा -(संस्कृत नाव- श्वेत दुर्वा) उचकी, ओकारी, ज्वर यावर औषधी.

५) बार -(संस्कृत नाव-बदरी) आयुवेर्दात आवाज बसल्यास, रक्तानिसार, घटसर्प, ओकारी यावर औषधी म्हणून सांगितलं आहे.

६) धोतरा -(संस्कृत नाव-धत्तूर) नखुरडे, दमा व फुफुसांचे विकार, खोकला, अर्धांगवायू यावर औषधी आहे. धोतरा विषारी आहे. याचा वापर वैद्यांच्या सल्ल्यानुसार करावा.

७) तुळस – ( संस्कृत नाव- तुलसी) खोकला, कर्णशूळ, टाइफॉइड, रक्तस्त्राव थांबवण्यास, त्वचा टवटवीत दिसण्यास उपयुक्त आहे.

८) शमी- (संस्कृत नाव- शमी, सवदंड) नखदंतविष, प्रमेह, गरमीवर ही उपयुक्त आहे.

९) आघाडा – (संस्कृत नाव- अपामार्ग) विंचवाचे विष, कुत्र्याचे विष, दातदुखी, कर्णबधीरता, रातांधळेपणा, मूळव्याध, कावीळ यावर औषधी आहे.

१०) डोरली – (संस्कृत नाव- बृहती, वार्ताकी) खोकला, विषबाधा इत्यादीवर ही औषधी आहे.

११) कण्हेर -(संस्कृत नाव- करवीर) विषबाधा, ताप, मूळव्याधीवर ही औषधी आहे.

१२) रुई -(संस्कृत नाव- अर्क) खोकला, कावीळ, अर्धशिशी, कानदुखीवर ही औषधी आहे.

१३) अर्जुन – जखम भरून येण्यास, अस्थिभंग, हृद्रोग, रक्तानिसार, जखम भरून येण्यावर ही उपयुक्त ठरतं.

१४) विष्णुक्रांत – ही वेल आकर्षक दिसते. मूळव्याध, कावीळ, पुटकुळ्या यावर ही औषधी आहे.

१५) डाळिंब – (संस्कृत नाव- दादिम) खोकल्यावर, अतिसारावर, डोळे येण्यावर औषधी आहे.

१६) देवदारा – (संस्कृत नाव- देवदारू) छातीत दुखणं, गंडमाळा इत्यादीवर ही वनस्पती औषधी आहे.

१७) पांढरा मारवा – (संस्कृत नाव- मरूबक) गरमी, अंगाचा दाह, ऱ्हद रोग यावर ही औषधी वनस्पती आहे.

१८) पिंपळ – (संस्कृत नाव-अश्वत्थ) उचकी, वांती, गरमी, तोंडात येणारे फोड, दमा, खोकला इत्यादीवर ही वनस्पती औषधी आहे.

१९) जाई – (संस्कृत नाव-जाति) कानदुखी, ओकारी, जखमा, टक्कल, ताप, खरूज यावर उपयुक्त आहे.

२०) केवडा – (संस्कृत नाव- केतकी) गरमी, रक्तप्रदर, चक्कर, डोकेदुखी इत्यादीवर उपयुक्त आहे.

२१) अगस्ती – (संस्कृत नाव- अगस्त्य) अर्धाशिशी, कफ, चक्कर, वातविकार यावर उपयुक्त.

या सर्व वनस्पतींचा वापर हा जाणकार वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावा. या वनस्पती औषधी असल्यामुळेच त्या गणेशाला प्रिय आहेत.