Posts Tagged ‘रोज अंडे खाल्ले तर काय होते?’

रोज अंडे खाल्ले तर काय होते?

रोज अंडे खाल्ले तर काय होते?

 

तुम्हाला तुमच्या शरिराला विटॅमिन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, प्रोटीन, आणि फॉफ्सरस सारखे पोषक क्षार एकाच आहारात पुरवायचे असतील, तर तुम्हाला वेगवेगळा आहार करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण सर्व पोषक क्षार तुम्हाला एकाचं पदार्थातून मिळणार आहे, ते म्हणजे अंडे.
अंड्यामध्ये मोठ्याप्रमाणात संतुलित घटकद्रव्ये असल्याने ते शरीरास पौष्टिक तसेच पचण्यासही हलके असते. आजच्या धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी एखाद्या रॉबोट प्रमाणे सतत कार्य करत असतो. वाढत्या कामाच्या व्यापामुळे शरीरात असलेला ऊर्जा खर्च होते. शरीराने वापरलेली ही ऊर्जा पुन्हा भरून काढण्यासाठी माणसाने पोषक असा आहार करावा, असे आहार तज्ज्ञ सांगतात.
अंड्यामध्ये प्रथिने व स्निग्ध पदार्थांबरोबरच जीवन सत्त्वे आणि क्षारही मोठ्या प्रमाणात असते. अंड्यात असलेल्या स्निग्ध पदार्थामध्ये “अनसॅच्युरेटेड`, फॅट्सचे प्रमाण सॅच्युरेटेड`फॅट्सपेक्षा जास्त असते. त्यामुळे यात कोलोस्टरॉलचे प्रमाण कमी असते. परिणामी, अंडे हे मानवी आहरामध्ये उत्तम ठरतात. हृदयविकार असणाऱ्या लोकांसाठी तर ते महत्त्वपूर्ण अन्न समजले जाते.
अंड्याचा अनेक वेगवेगळ्या प्रकारांत आहारामध्ये वापर केला जातो. ऑमलेट, अंडाकरी, ऑमलेटकरी, एगराईस, अंड्याचा पराठा तसेच वेगवेगळ्या केक प्रकारातही अंड्याचा वापर केला जातो. अंड्यामधील तेल व पिवळा बलक हे विविध आजारांवर जसे डोळ्यांचे विकार, कातडीचे विकार, तसेच हाडांचे विविध विकार, इतर आजारांवर, व्याधींवर रामबाण उपाय आहे.
औषधाप्रमाणेच, सौंदर्य प्रसाधने आणि विविध खाद्य पदार्थांमध्येही विशेष घटकद्रव्ये म्हणून अंड्यातील पिवळा बलक अतिशय गुणकारी आहे.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - February 10, 2015 at 11:00 am

Categories: World News   Tags:

© 2010 PupuTupu.in