Poet Bahinabai Chaudhari Songs Kavita in English
बहिणाबाईंच्या कवितांचे सीमोल्लंघन
बहिणाबाईंच्या कविता अनुभवाव्या लागतात. त्यांचा अनुवाद करणे ही खरोखरच आव्हानात्मक बाब. तप्त मातीवर पावसाचा पहिला थेंब पडल्यानंतर जो मृदगंध उमटतो, त्याचे वर्णन करण्याइतकेच ते कठीण आहे. अनेक पिढ्या बहिणाबाईंच्या कविता ऐकत मोठ्या झाल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी ऐकताना त्या नवीन अर्थ सांगतात, वेगळी दृष्टी देतात. आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना एका प्रोजेक्टसाठी माधुरी शानभाग यांनी बहिणाबाईंच्या एका कवितेचा अनुवाद करून दिला होता. विशेष म्हणजे केरळमध्ये जेव्हा त्याचे सादरीकरण झाले, तेव्हा तेथील टेक्नोक्रॅटना त्या ओळी आवडल्या. इतक्या वर्षांनंतरही बहिणाबाईंच्या कविता हृदयाला भिडत असतील, तर त्यांचा अनुवाद करण्याचे आव्हान पेलायलाच हवे, असे शानभाग यांना वाटले. अनुवादामध्ये बहिणाबाईंच्या कवितेतील सौंदर्य काही अंशी उतरले तरी सार्थक झाले, असे त्या म्हणतात.
‘फ्रॅगरन्स ऑफ द अर्थ’मध्ये त्यांनी बहिणाबाईंच्या कवितांचे मन आणि हृदय, माहेर, प्राक्तन आणि घर, आसपासचे लोक, शेती आणि सणवार, देव आणि अन्य कविता अशा सात विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, इंदिरा संत, बा. भ. बोरकर, डॉ. मालतीबाई किर्लोस्कर, डॉ. प्रभा गणोरकर, आदींचे बहिणाबाईंबद्दलचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. उषा तांबे यांची प्रस्तावना लाभली आहे. बहिणाबाईंचा अल्प परिचयही सुरुवातीला देण्यात आला आहे.
दांडगी निरीक्षणशक्ती, उत्तम स्मरणशक्ती, तल्लख बुद्धिमत्ता आणि प्रतिभा बहिणाबाईंपाशी होती, याचा प्रत्यr त्यांनी रचलेल्या ओव्या वाचताना ठायी ठायी येतो. त्या निरक्षर होत्या, पण अडाणी नव्हत्या. रोजच्या जगण्यातील प्रत्येक गोष्टीवर त्यांनी काव्य केले. जात्यावर दळता दळता, चूल फुंकता फुंकता, चुलीपुढे भाकर थापताना, शेतात काम करतानाचा प्रत्येक क्षण त्यांनी टिपला आहे. परिस्थिती कशीही असली तरी धीर सोडायचा नाही, आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड द्यायचं, हे त्यांनी मनाशी पक्कं केलं होतं. त्यामुळे त्यांच्या अनेक रचना संतांच्या रचनेशी एकरूप झाल्यासारख्या वाटतात. शानभाग यांनी त्या कवितांचे वैशिष्ट्य कायम राखत यमकं जुळवण्यापेक्षा अनुवाद उत्तम कसा होईल, याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे. प्रत्येक कवितेआधी कवितेची थोडक्यात माहिती दिली आहे. अनेक शब्द मूळ रूपातच ठेवले आहेत. उदाः माहेर, संसार, मंत्र, रथ, रोटी. यामुळे भारतीय वाचकांना या कविता समजणं अवघड नाही.
पुस्तकातील पहिलीच कविता आहे ‘सरसोती, माय मदर’. कोणतेही शिक्षण नसताना कविता कशा सुचतात, या प्रश्नाला बहिणाबाईंनी असे उत्तर दिले आहेः My Mother, Godess Sarasotee
Teaches me, words and meaning of all
‘Her’ secrets, she sows
In ‘Her’ favorite daughter’s soul
कवितेमध्ये त्या म्हणतात, ‘फुलामधी सामावला, धरित्रीचा परिमय, माझ्या नाकाले विचारा, नथनीले त्याचे काय?’
मातीचा सुवास फुलांमध्ये उतरला आहे, हे माझ्या नाकालाच समजते. बाह्य अलंकार असलेल्या नथनीला ते काय कळणार? इतक्या साध्या सरळ गोष्टीतून त्यांनी किती मोठा अर्थ सांगितलाय.
‘अरे संसार संसार’ ही बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता शानभाग यांनी उत्तमरीत्या अनुवादीत केली आहे.
Oh! This Sansar, this Sansar
Like a griddle on the stove
One has to face the burns first
And then only get the Roti roasted.
शेतावर काम करून थकलेली घरधनीण घरी परतते. तिला घरच्यांसाठी जेवण करायचं आहे, पण चूलच पेटत नाहीये. या परिस्थितीवरही त्यांनी काव्य केले आहे, हे पाहून थक्क व्हायला होते.
The Kitchen is full of smoke,
It is just not fading,
My eyes are red
The stove is not igniting
It is just not igniting
I am blowing and blowing air
Everybody at home
Is hungry, waiting for food.
अहिराणी बोलीतील शब्द आणि कवितांचा बाज कायम ठेवणे अधिक आव्हानात्मक होते. ते शिवधनुष्य शानभाग यांनी पेलले आहे.
– स्नेहल जोशी-कुळकर्णी
फ्रॅगरन्स ऑफ द अर्थ, अनुवादः माधुरी शानभाग, राजहंस प्रकाशन, पानेः १६५, किंमतः ३०० रु.
bahinabai bahinabai chaudhari bahinabai poems bahinabai chaudhari marathi kavita bahinabai chaudhari poems bahinabai chaudhari songs marathi kavita bahinabai bahinabai kavita bahinabai song bahinabai songs sant bahinabai bahinabai chaudhari in marathi bahinabai chaudhari songs download sant bahinabai chaudhari bahinabai chaudhari poem bahinabai marathi kavita bahinabai chya kavita sant bahinabai in marathi bahinabai chaudhari song bahinabai chaudhari songs free download bahinabai choudhari bahinabai songs free download bahinabai chaudhari kavita mp3 bahinabai chaudhari mp3 songs download saint in maharashtra saints of maharashtra in marathi poet in marathi poem on maharashtra in marathi urmila dhangar songs download poet in india poet of india
Categories: Uncategorized Tags: bahinabai, bahinabai chaudhari, bahinabai chaudhari in marathi, bahinabai chaudhari kavita mp3, bahinabai chaudhari marathi kavita, bahinabai chaudhari mp3 songs download, bahinabai chaudhari poem, bahinabai chaudhari poems, bahinabai chaudhari song, bahinabai chaudhari songs, bahinabai chaudhari songs download, bahinabai chaudhari songs free download, bahinabai choudhari, bahinabai chya kavita, bahinabai kavita, bahinabai marathi kavita, bahinabai poems, bahinabai song, bahinabai songs, bahinabai songs free download, marathi kavita bahinabai, poem on maharashtra in marathi, poet in india, poet in marathi, poet of india, saint in maharashtra, saints of maharashtra in marathi, sant bahinabai, sant bahinabai chaudhari, sant bahinabai in marathi, urmila dhangar songs download