Posts Tagged ‘Jobs in Indian Air Force for Pilot and Observer’

Jobs in Indian Air Force for Pilot and Observer

पायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी भरती

 

भारतीय नौदलातर्फे पायलट व ऑब्झर्व्हर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पायलट – पायभूत हवाई प्रशिक्षणानंतर लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स चालवण्याची संधी प्राप्त होते. यामध्ये अत्याधुनिक (कटिंग एज टेक्नोलॉजी) विमानं चालवण्याचीही संधी मिळते

ऑब्झर्व्हर – प्रशिक्षणानंतर इंडियन नेव्हल एव्हिएशन आर्ममध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये विविध अत्याधुनिक साधने (सॉनिक्स, रडार, सोनार्स, दळणवळणाची साधने) हाताळण्याची संधी मिळते. नौदलाच्या सर्व ऑपरेशन्समध्ये प्रत्यक्ष विमानात बसून टेहाळणी करण्याची संधी मिळते.

वयोमर्यादा –

सर्वसाधारण उमेदवार -१९ ते २४ वर्षे

सी.पी.एल. (कमर्शियल पायलट लायसन्स) धारक – १९ ते २५ वर्षे

शैक्षणिक पात्रता –

सर्वसाधारण उमेदवार – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसंच १२वीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणं आवश्यक आहे.

सी.पी.एल. (कमर्शियल पायलट लायसन्स) धारक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) तसंच १२वीला गणित व भौतिकशास्त्र विषय घेतलेले असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे डि.जी.सी.ए.कडून दिलं जाणारं कमर्शियल पायलट लायसन्स असणं आवश्यक आहे.

पायलटसाठी केवळ पुरुष उमेदवार पात्र असतात. तर ऑब्झर्व्हरसाठी पुरुष व महिला दोन्ही पात्र असतात.

निवड प्रक्रिया –

शैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी बोलावले जाते. एस.एस.बी. मुलाखत पाच दिवस चालते. पहिल्या टप्प्यात इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन व ग्रुप डिस्कशनचा समावेश होतो. तर दुस-या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क व मुलाखतीचा समावेश होतो. पायलटसाठी पायलट अॅप्टिट्यूड टेस्ट असते. पायलट व ऑब्झर्व्हर या दोघांसाठी एव्हिएशन मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. प्रशिक्षणानंतर उमेदवारांची सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती केली जाते. विविध भत्त्यांसह सब-लेफ्टनंटचे मासिक वेतन अंदाजे रू. ८३,०००/- इतकं असतं.

प्रवेश अर्ज –

प्रवेश अर्ज केवळ ऑनलाईन भरायचे आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १८ ऑक्टोबर २०१३ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी www.nausena-bharti.nic.in ही वेबसाईट पहावी.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 17, 2013 at 5:05 am

Categories: Jobs   Tags:

© 2010 PupuTupu.in