Archive for October, 2013

Drum Beat means SIVAMANI

 

शिवमणी

Drum Beat means SIVAMANI

आयुष्याला जर ‘जीवनगाण’ म्हटलं, तर त्यात आपले शब्द, इतरांचे सूर आणि नशिबाचा ताल यांची गुंफण अगदी चपखल व्हायला पाहिजे. यापैकी शब्द आपले आपण ठरवतो, सूर कुणाशी जुळवायचे, ते देखील आपण ठरवू शकतो, मात्र ‘ताल’ हा विषय सर्वस्वी नियतीच्या हाती असतो. म्हणूनच नशीब लिहिण्याची आणि ते बदलवण्याची सर्वोच्च शक्ती जवळ असणारया महादेवाने स्वत:जवळ डमरू हे तालवाद्य ठेवलं असावं.

आनंदम शिवमणीच्या नशिबाची गाठ याच महादेवाने याच तालवाद्याशी कायमची बांधून ठेवली आहे. मुळात तालवाद्यापेक्षा शिवमणीची गाठ ‘ताल’ या संकल्पनेशीच बांधली आहे, असं म्हणावं लागेल. कारण शिवमणीला वाजवण्यासाठी अमूक एक वाद्यच लागते, असे काही नाही. ड्रम, डमरू, तबला, ढोल आणि ढोलकीच नव्हे, तर पावभाजीचा तवा, कढई, पाण्याची बादली, काचेची बाटली, ताट, वाटी, चमचा आणि जे वाटेल ते… शिवमणी दगडातही ताल शोधू शकतो आणि विटेतूनही बिटस काढू शकतो.

गेल्या ३५ वर्षाच्या त्याच्या तालयात्रेने या अवलिया कलावंताला भारतातील प्रथम क्रमांकाचा आणि जगातील पहिल्या पाच ड्रमर्सपैकी एक ड्रमर बनवले आहे. १९५९ साली जन्मलेल्या आणि वयाच्या १४ व्या वर्षापासून तालवाद्यांची संगत करत आलेल्या शिवमणीचे वादक म्हणून करिअर जरी ३५ वर्षाच्या आसपास असले तरीही त्याला लाभलेली तालपरंपरा मात्र शंभर वर्षाहून जुनी आहे. शिवमणीचे वडील एस. एम. आनंदन हे दक्षिण भारतातील गाजलेले ड्रमर. तामीळ चित्रसृष्टीत त्यांचा चांगलाच दबदबा होता. घराण्यातच मुळात संगीतची परंपरा. संगीताबरोबरच वैदिक शास्त्री घर असल्यामुळे वेदमंत्र आणि संस्कृत श्लोकांचे संस्कारही शिवमणीवर लहानपणापासूनच झाले. अगदी लहान असतांनाच, तो शंख वाजवायला शिकला. वडिलांना ड्रम वाजवताना पाहून त्याने अनेकदा ड्रम वाजवण्याचा हट्ट धरला. मात्र तेव्हा त्याला तुटकी स्टीक आणि फुटका कोंगो या व्यतिरिक्त काहीही मिळालं नाही. अनेक महिने लाकडाच्या एका स्टुलवर ठकठक करत घालवल्यावर त्याला पारंपरिक कर्नाटक संगीताचे धडे देण्यास सुरुवात झाली. वयाच्या सहाव्या वर्षी पहिल्यांदा ड्रमवर ताल धरला आणि अकराव्या वर्षी पहिल्यांदा रंगमंचावर कला सादर केली. यानंतर ड्रमच्या स्टिक्स सोडल्या पेन, पेन्सिल, पुस्तक किवा इतर नादरहित गोष्टी काही त्याने फारशा हाताळल्या नाहीत. शालेय शिक्षणात त्याला अगदीच पासिगपुरता रस होता.

शिवमणीचे दहावी बोर्डाचे पेपर सुरू असताना, त्याचे वडील सिगापूरच्या एका कार्यक्रमात ड्रम वाजवणार होते. या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर सोबत करण्यासाठी म्हणुन त्यांनी वेळेवर शिवमणीला बोलावणं धाडलं. तो तडक सिगापूरकरडे निघाला. परिक्षा राहिली ती कायमचीच. व्यावसायिक क्षेत्रात ड्रमर म्हणून शिवमणीला पहिली संधी मिळाली ती के. व्ही. महादेवन यांच्याकडे, महोदवन म्हणजेच मामा. हे त्या काळातील तामिळ आणि तेलगु संगीत क्षेत्रातील खूप मोठं नाव होतं. त्यांच्याकडे रेकॉर्डींग करत असतांनाच शिवमणीवर एस. पी. बालसुब्रमण्यम  यांची कृपादृष्टी झाली. बालसुब्रमण्यम तेव्हा हिदी चित्रपटसृष्टीही गाजवत होते. त्यांनी वेळोवेळी शिवमणीला मार्गदर्शन केलं. आजही करत आहेतच.

या वेळी भारतात ड्रमर्सचे एवढे चलन नव्हते. म्हणून मग वडिलांकडून कलेचे धडे घेणारया शिवमणीला आपले आदर्श देशाबाहेर शोधावे लागले. विल्यम कॉबहॅम हे या क्षेत्रातलं त्या काळातलं जॅझ आणि रॉक क्षेत्रातील गाजत असलेलं नाव! शिवमणी त्याचा भक्त झाला. डोक्याला पटका बांधण्याची, भडक रंगीत कपडे घालून, चेहरयावर मोकळेपणाने हसत ड्रम वाजवण्याची त्याची स्टाईल बिली कॉबहॅमच्या प्रभावातूनच आलेली आहे. त्याला ऐकता यावं आणि नव्या संधी मिळाव्या म्हणून शिवमणीने जीवाची मुंबई करायचं ठरवलं.

मुंबईत आल्यावर त्याच्यामधील उपजत कलावंताला नवं आकाशच मिळालं. उस्ताद झाकीर हुसैन पासून, ते लुई बॅन्क्सपर्यंत सगळ्यांबरोबरही त्याने १९९० मध्ये पहिल्यांदा रंगमंचावर कला सादर केली. शिवमणी हे नाव आता चांगलंच गाजायला लागलं. शिवमणीला ड्रम वाजवण्याचं बाळकडू घरातूनच मिळालं असलं आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एस. पी. बालसुब्रमण्य सारख्यांच्या पाठिब्याने त्याचं मुंबईतील स्थानही बरंच प्रबळ झालं असलं, तरीही केवळ या कारणांमुळे त्याची वाटचाल सहज झाली, असं म्हणणं म्हणजे पक्र्युश्यन या क्षेत्रात शिवमणी होण्यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष केल्यासारखंच होईल. कर्नाटक संगीताचे घरातून मिळालेले प्राथमिक शिक्षण एवढेच काय ते संचित घेऊन, शिवमणीने आपली तालतपस्या सुरू केली होती. घटम वादक विक्कु विनायकराम, मृदंगवादक टी. के. मूर्ती, कंजीरावादक नागराजन, टी. व्ही. गोपालकृष्णन, कुन्नाकुडी वैज्यनाथन यासारख्या शास्त्रीय संगीताला आयुष्य वाहून घेतलेल्या गुरूंचे शिष्यत्व मिळवण्यासाठीच त्याला खूप धडपड करावी लागली.

मुंबईत दक्षिण भारतीय संगीत क्षेत्रातील लोकांचा एक वेगळा दबदबा आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास, सराव आणि कर्नाटक आणि हिदुस्थानी या शैलींचा संगम ही या कलावंताची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. शिवमणीलाही आपले सुरवातीच्या दिवसातील सोबती याच कलावंतांमध्ये मिळाले. ‘श्रद्धा’ या बॅण्डचा तो भाग बनला. एकवार या बॅण्डच्या इतर सहकारयांच्या नावाकडे वळून पाहू या, म्हणजे ‘श्रद्धा’ ची शक्ती आपल्या लक्षात येईल. गिटारवर लॉय मॅडोसा (शंकर-एहशान-लॉयक मधील), मॅडोलीनवर यु. श्रीनिवास (पद्मश्रीसह अनेक पुरस्कार, शिवाय मायकल जॅक्सनसह अल्बम्स) आणि गायक म्हणून हरिहरन आणि शंकर महादेवन (बस नाम ही काफी है) जवळपास तीन दशके तालवाद्यांची तपस्या करून, झाल्यानंतर शिवमणीचे आराध्य भगवान शिव त्याला प्रसन्न झाले. तेव्हा मणिरत्नम यांनी तामिळमध्ये रोजा चित्रपट बनवायला घेतला.

ए. आर. रहमानने या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसंगीतात पदार्पण केलं. आपली खास ‘चमू’ जमवतांना रहमानच्या लिस्टमध्ये ड्रमर म्हणून शिवमणीशिवाय इतर कुणाचं नाव असतं तरच नवल. रहमानबरोबर शिवमणीची जोडी ही रोजापासून जी जमली ती बॉम्बे, लगान, दिल से, गुरू, ताल ये थेट स्लमडॉग पर्यंत कायम आहे. रहमानच्या वल्र्ड टुरचा शिवमणी हा अविभाज्य घटक असतो. केवळ त्याचा सोलो परफॉर्मन्स ऐकायला येणारे रसिकही काही कमी नाहीत. जगभर रॉक, जॅझ, पॉप आणि संगीताच्या सगळ्याच प्रकारांचे चाहते शिवमणीचेही फॅन्स आहेत.

शिवमणीला मात्र आपली भारतीय, तमिळ ओळख जपण्यातच खरा अभिमान वाटतो. आपल्या सादरीकरणादरम्यान तो मंत्रपठण करतो, नोटेशन्स म्हणून दाखवतो, शंख वाजवतो, ॐकार गाऊन दाखवतो. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव’ हा त्याचा मंत्र येतील तेवढ्या भाषांमध्ये समजावून सांगतो आणि भारतीय संस्कृती आणि संगीताचं वेगळेपण पटवून देतो. शिवमणीला दक्षिण भारतीय भाषांबरोबरच चांगलं मराठी आणि तुटक हिदी बोलत येतं. संगीत तो लहानणपणी शिकलाय, त्यामुळे गाणारा गळा त्याच्याकडे आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच हिदी सिनेमाची गाणीही तो गुणगुणत असतो. त्याची आणखी एक खाशियत…. २००९ मध्ये त्याने स्वत:चा पहिला नादवाद्यांचा अल्बम काढला. ‘महालीला’ असं त्याचं नाव. याशिवाय एशिया ईथनिक आणि सिल्क अन् श्रद्धा या त्याच्या दोन बॅण्डसह कार्यक्रम देण्यात तो व्यस्त आहे. या दोन्ही बॅण्डचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाचे अधिष्ठान! एशिया ईथनिकच्या तर लोगोमध्येच शिवाचा त्रिशूळ आहे.

शिवमणीला भक्ती, संगीत आणि जीवन या गोष्टी एकमेकांच्या सोबती वाटतात. त्याला परंपरांबद्दल नितांत आदर आहे. पारंपरिक वेषभूषा, तामिळ भाषा, याबरोबरच भारतीय संस्कृतीमधील गुरुकुल शिक्षणपद्धतीचा तो समर्थक आहे. लवकरच तो स्वत:चे गुरुकुलही काढणार आहे. शिवाच्या आशिर्वादाने सुरू झालेली शिवमणीची ही वाटचाल, त्याला जगभर गाजत असलेल्या एका वाद्याचा गुरू तर बनवतेच, शिवाय भारतीय संस्कृतीचा वैश्विक राजदूतही बनवते.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 16, 2013 at 6:23 pm

Categories: Marathi   Tags: ,

Humility of JRD Tata

विनम्रता

मुंबईच्या रस्त्यावरून प्रचंड वेगाने आपली आवडती  बुगाटी चालवणे हा तरुण जेहचा शौक होता. त्याचे असे भटकणे मुंबई वाहतूक पोलिसांच्या नजरेत भरले होते. कधी एकदा या पोराला अडकवतो आणि त्याच्या वेगाला लगाम घालतो, याची वाटच ते बघत होते आणि पोलिसांना संधी मिळाली. मेहता नावाचा जेहचा मित्र आणि जेह जुहूवरून आपापल्या गाड्यांनी भटकत होते. जुहूहून दोन वेगवेगळ्या रस्त्यांनी येऊन कॅम्पस कॉर्नरला एकत्र येण्याचे त्यांनी ठरवले. जेह ठरलेल्या ठिकाणी आला आणि मेहताची वाट बघू लागला.

बराच वेळ झाला, पण मेहताचा पत्ताच नव्हता. कंटाळून जेह मेहताला शोधायला दुसरया रस्त्याने परत निघाला. वाटेतच त्याला कळले की, पेडर रोडला एका गाडीला अपघात झाला आहे. जेहने उत्सुकतेने तिथे जाऊन पाहिले आणि नेमकी ती त्याच्या मित्राचीच गाडी होती. कोणतीही चौकशी न करता पोलिसांनी जेहवर खटला भरला. जेह आणि मेहता गाडीची शर्यत लावत होते आणि त्यातूनच अपघात झाला. काहीही चूक नसताना जेह चांगलाच अडकला होता. यातून सुटण्यासाठी जेहला एका चांगल्या निष्णात फौजदारी वकिलाची गरज होती. कुणाच्या तरी शिफारशीवरून त्याने ताजमहाल हॉटेलच्या मागच्या गल्लीत राहाणारया जॅक विकाजी या निष्णात वकिलाची भेट घेतली. विकाजी त्या काळातले निष्णात आणि नावाजलेले वकील होते. काहीही चूक नसलेल्या जेहची विकाजी यांनी अलगद सुटका केली, पण या दरम्यान जेहच्या नशिबात वेगळाच अपघात लिहून ठेवलेला असावा. केसच्या दरम्यान विकाजी यांचेकडे जाता-येता विकाजींची पुतणी थेल्मा हिने पहिल्याच नजरेत जेहची केस जिकली. कोर्टातला खटला संपल्याबरोबर जेह आणि थेल्मा विवाहबद्ध झाले.

थेल्मा जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्ची विद्यार्थिनी होती. कलासक्त मनाच्या आणि परिपूर्णतेचा हव्यास असणारया थेल्माने जेहमधल्या वेगाला नियंत्रण लावलं. कामावरच प्रेम, शिस्त, समृद्ध सामाजिक जाणिवा या सर्वांचं महत्त्व थेल्माच्या सहवासातून जेहला कळत गेलं. थेल्मासारख्या संवेदनशील पत्नीसोबतच्या सहजीवनातून त्याचं व्यक्तिमत्त्व अधिकच प्रभावी होत गेलं. त्याच्यातला वेग, त्याच्यातली ऊर्जा देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी उसळू लागली. जेह ते जेआरडी टाटा या वेगवान, पण प्रगल्भ प्रवासात थेल्मा नावाचा अपघात झाला नसता, तर जेआरटी टाटा कदाचित जेआरडी टाटा झाले नसते.

भारतरत्न जेआरडी टाटांना आपण कॉलेजमधून पदवीशिक्षण घेऊ शकलो नाही याची खंत आयुष्यभरासाठी होती. एकदा घरगुती मैफलीत जिवाभावाच्या दोस्तमित्रांसोबत गप्पा झडत होत्या. गप्पांचा विषय शिक्षणावर घसरला. अचानक त्यांचा अतिशय हुशार असणारा पदवीधर मित्र त्यांना म्हणाला, ‘‘तू एवढे मोठे उद्यागधंदे चालवतो. तू एवढा श्रीमंत आहेस तरीसुद्धा तू स्वत:बद्दल अजीबात मोठेपणा बाळगत नाही. तू इतका विनयी आणि नम्र कसा काय आहेस, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. जर तुझ्याकडे केंब्रीजची पदवी असती तर तू असाच राहिला असता काय?” एका क्षणासाठी जेआरडी अंतर्मुख झाले आणि लगेच हसत हसत त्या मित्राला म्हणाले, ‘‘मी जर केंब्रीजची पदवी घेतली असती तर निश्चितच थोडा वेगळा राहिलो असतो. मला किती थोड्या विषयांबद्दल किती तुटपुंजी माहिती आहे याची जाणीव क्षणोक्षणी झाली असती. या जगात असणारया ज्ञानसागरातली ओंजळसुद्धा आपण प्राप्त करू शकलो नाही हे मला कळले असते. आपण किती क्षुद्र आहोत हे कळल्याने कदाचित मी अधिक नम्र झालो असतो.” केवळ प्रश्न विचारणारा मित्रच नव्हे,तर मैफिलीत बसलेले सारेच जेआरडींच्या उत्तराने अवाक् झाले…

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 6:16 pm

Categories: Marathi   Tags:

Penance to mind

तप-Penance

लहानपणापासून सतत कानावर येणारा शब्द म्हणजे ‘तप’ होय. आठ वर्षाच्या ध्रुवाने घनघोर अरण्यात तप केल्याची गोष्ट आजी सांगे. त्या वेळी तपाचा अर्थ जरी उमगला नाही, तरी तप हे काही वेगळे प्रकरण आहे असे वाटे. छोट्याशा प्रल्हादाने तप केले. मोठ्ठ्या खांबातून नरसिह प्रकटला. ऋषीही तप करतात. मुनी-संत सारेच तप करतात. तप अरण्यात करायचे. त्यासाठी घर सोडायचे. गाव सोडायचा. एकान्तात जायचे, असे काहीबाही…असे ऐकत ऐकत काहींनी पर्वतात तप केले. काहींनी गुहेत, घळीत, गुंफेत, नदीच्या उगमापाशी, समुद्रकाठी तप केले. तपाचा ताप असा चढत चालला.

चवथीच्या वर्गात गुरुजींनी शुद्धलेखनाचा गृहपाठ दिला. पाच ओळी होत्या. त्यातली एकेक ओळ पाच पाच वेळा सुवाच्च लिहून आणायला सांगितली. कंदिलाच्या श्रीमंत प्रकाशात एकेक अक्षर जीव ओतून उतरवीत होतो. खूप वेळ लागला. आई म्हणाली, ‘‘रात्र दाट झालीय. झोप आता. सकाळची शाळा आहे.” कंदिलातले रॉकेल संपायला आले. हात दुखला; पण आनंदाने. किती वेळ गेला नाही ठाऊक. घड्याळ नव्हते. उन्हाच्या सावलीवरून नि नक्षत्रांच्या वावरण्यातून वेळ कळे. शाळेत सकाळी सकाळी पहिल्याच तासाला गुरुजींनी शुद्धलेखन पाहिले नि शाबासकी देत म्हणाले, ‘छान तप केलेले दिसते.’ गुरुजींच्या या बोलण्यातून मला तप आपले वाटायला लागले. पुढे त्याचा अर्थ गवसला. पण, अर्थापेक्षा त्याचा आवाका कळला. या दोन अक्षरांत आपली मानवी संस्कृती दडलीय, असे जाणवले.

तप अभ्यासात असते. साधनेत असते.  कलेत असते. व्यापारात असते. चिकाटीने एखाद्या विषयाचा सांगोपांग अभ्यास करणे हे तप असते. एखादे आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या संशोधनाला वेचतो, तो त्याला आपले सर्वस्व देतो. त्यात तो सर्वार्थाने तापून निघतो. इथे यशापयशाची बाब किरकोळ ठरते. तो यातून मला काय मिळणार याचा विचार न करता त्यात झोकून देतो, त्याला ‘तप’ म्हणतात. ही साधना युगायुगांची असते, ती जाणिवा समृद्ध करते. आपण आधी आपल्या आत-आत उतरून खोलवर विचार करतो नाऽऽ तिथून आपल्या तपाचा शुभारंभ होतो. मी मला स्वच्छ वाचीत वाचीत मी समृद्ध करणे, हे महत्त्वाचे तप आहे. बरेचसे अध्र्या हळकुंडात पिवळे होतात, ते तपाचे देखावे असतात. देखावे फक्त पाहण्यासाठी असतात. त्यामुळे देखावे तितपत असतात. खरे मानून स्वत: स्वत:ला जो उत्तम वाचतो, तो कायिक तपी असतो.

खोल वाचण्यासाठी सद्गुरूंची गरज लागते. आपली आंतरिक खोली स्वच्छ झाली की, सद्गुरू आपणहून तुमच्या दारावरली बेल वाजवत्यात, त्यासाठी अनुग्रहांच्या भरल्या बाजारात जायची गरज नसते. आपली खोली स्वच्छ करण्यासाठी ध्यानाचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. पाच मिनिट डोळे बंद केले की, ध्यान संपले नव्हे. डोळे जरी बंद केले, तरी ध्यानात भलतीच ध्याने दिसतात. त्यासाठी मनाला विश्वासात घ्यावे लागते. मनावर नियंत्रण असले की, अभ्यासाला मूड लागतो. एका जागी नीट बसण्याची बुद्धी येते. जागा निवडली जाते. त्यासाठी नामसाधना उपयुक्त ठरते. वृत्तीला अनुकूल असे नाम जरी आपण निवडले, तरी त्याचे रजिस्ट्रेशन सद्गुरू करतात. ते नामसाधनेची आखणी करतात. नामाला आणि आचाराला पूरक असे वातावरण निर्माण करतात. ती वाणीला तोलून धरते. नेमक्या शब्दातून ती प्रकटते. त्यापेक्षा एकान्त-मौनातून अधिक फुलते, याला ‘वाचिक तप’ म्हणतात. अशी वाणी मानस धारणा पक्की करते. अभ्यासाच्या सवयीत रूपांतरण करते. श्वासाच्या सहजतेत नाम कळायला लागते. मानसिक आधाराला नवी बळकटी देते. याची परिणती साक्षात्कारात होईपर्यंत जी सातत्याने साधना असते, तिला ‘मानस तप’ तपी हे आयुष्यभर जपतो.

मी करीत असलेल्या चांगल्या कामाला जितका वेळ देतो, ते माझे तप असते. गरजेपुरते देहाला मिळाल्यानंतर मी अंतरंगातल्या जाणिवांना पुसत पुसत गुरुसंगतीत जितका रमतो, ते माझे तप असते. ते न कंटाळता मी करतो. त्यासाठी कुठल्याही प्रसिद्धीची गरज नसते. फोटो जाहिरात काहीही नको. आपणच आपली साक्षांकित प्रत होतो. अशा तपातून ज्ञान उजळते. कर्माला आकाश मिळते. भक्तीला पृथ्वी लाभते. जगण्यात नवेपण येते. कामाकामात आनंद वाटतो. आपणास बहर येतो. नवी ऊर्जा, नव्या दिशा देते, नव्या नव्या प्रकल्पांना आपला आधार वाटतो. अशी तपे चिरंजीव-मूल्यगर्भ असतात. तपी देहाने गेले, तरी तपाने पृथ्वीवर वावरतात. योगवासिष्ठात वसिष्ठमहर्षी प्रभू श्रीरामांना सांगतात, ‘‘तपसैवं महोग्रेण यद्दुरापं साधनेने आपल्यात जाणती जाणीव निर्माण होते, म्हणतात. हेच खरे तप असते. तदाप्यते.” मिळविण्यास कठीण अशी कोणतीही वस्तू उग्रतपाने मिळते, मात्र तप पुण्यप्रद असावे. आसुरी तप वर्जावे. तपात आपण रमलो की, सोन्याचा पिपळ आपल्याशी बोलतो. पंचवटीत मुक्त मनाने हिडता येते.

महर्षी पाणिनीने शब्दांसाठी तप केले. आद्य शंकराचार्यांनी आत्मज्ञानासाठी आपली काया तपात झिजविली. स्वामी विवेकानंदांनी प्रखर ज्ञानाचे तप केले. विश्वाला थक्क केले. स्वामीजी सांगत, ‘‘तपातून मोठे व्हा. वर्तमानाला सामोरे जा. जोपर्यंत मनात तडफ आहे, तोपर्यंत खूप चांगले काम करा. तुम्ही अमृताचे पुत्र आहात.” तपातून विश्व उभारता येते. तप चिरंजीव असते. तपाने मोठमोठी कामे सहज होतात. तपातून राष्ट्रीय जीवनाला स्वच्छ चारित्र्याचे अधिष्ठान मिळते. नैतिकतेला उभारी येते. मोठ्या माणसांची जीवनचरित्रे तपावर आधारित आहेत. तप फक्त अरण्यात होते असे नाही. आपण पत्करलेले कोणतेही काम तप आहे. असे मानून केले, तर विश्वाला सुखाच्या वाटा नक्की दिसतील. सगळीकडे चांगल्या गोष्टी फुलतील म्हणून सूर्याची प्रार्थना करून तपाचा तिळगूळ एकमेकांना वाटू या.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 6:08 pm

Categories: Marathi   Tags:

Pisces Sign – Pisces Characteristics – Meen Rashi

मीन राशीची वैशिष्ट्येPisces Sign – Pisces Characteristics – Meen Rashi

मीन राशी ही मोक्षाची राशी समजली गेली आहे. अध्यात्म, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण सत्संग, परोपकार, पवित्र आचरण याद्वारे संसार नेटका करून, भवसागरातून तरून जाणारी ही राशी आहे. चौरयांशी लक्ष योनिचा शेवटच जणू येथे होतो व राशीचक्राच्या शेवटच्या या राशीत क्रांतीवृत्ताचे राहटगाडगे संपून व्यक्ती मुक्त होते.

Pisces

Pisces


राशीचक्राची बारावी आणि शेवटची राशी मीन. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे शेवटचे चरण, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती हे पूर्ण नक्षत्र यांचा मीन राशीत समावेश आहे. ही राशी जलतत्त्वाची असून, स्त्री स्वभावाची आहे. द्विस्वभावी आहे. तसेच या राशीचे स्वामित्व गुरुमहाराजांकडे आहे. विरुद्ध दिशांना तोंड करून संचार करत असलेले दोन मासे हे या राशीचे मोठे सूचक बोधचिन्ह आहे. स्त्री राशी, जलतत्त्व यामुळे हळवेपणा, द्विस्वभावामुळे चंचलता व गुरुच्या स्वामित्त्वामुळे पापभिरू पणा, असे या मीन राशीच्या व्यक्तीच व्यक्तीदर्शन होते. या राशीचा स्वामी भारतीय ज्योतिषानुसार ‘गुरू’ व पाश्चात्त्य ज्योतिषांनुसार ‘नेपच्युन’ हा आहे.

‘मीन’ या व्यतिरिक्त या राशीचे काही अन्य पर्यायवाचक शब्द आहेत. अंतिम, अंत्यम, अन्त्यगम, कन्द, तिमि, मत्स्य, अंडज, अनिमेष, जलचर तर इंग्रजीत यास ‘पिसीस’ म्हणतात. ज्या व्यक्तीची चंद्रराशी ‘मीन’ आहे, त्यांना या राशीचे बरेचसे गुणधर्म लागू होतात. त्याचप्रमाणे ज्यांचे ‘मीन लग्न आहे, (लग्नराशी मीन आहे) त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारच्या गुणधर्माचा प्रभाव असतो. ‘मीन’ ही राशीचक्राची एक अत्यंत जटिल राशी आहे. या राशीच्या दुहेरी स्वभावामुळे या व्यक्ती दोन परस्परविरुद्ध दिशांकडे ओढली जाते. या मानसिक गोंधळामुळे त्यास असे वाटावयाला लागते की सर्व काही चुकीचे आहे. त्यामुळे पुष्कळदा योग्य निर्णय घेणे कठीण जाते. या मीन व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व साधेसुधे, गौरवर्ण, उंचीला मध्यम आणि तसे पाहिल्यास या राशीचे बरेच जण स्थूल असतात. स्वभाव मानी परंतु हळवा असल्याने, अपमान झाल्यास त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येते.  त्यांच्यावर बाजू उलटल्यास चेहरा गोरामोरा होतो. थोडक्यात म्हणजे हे लोक अत्यंत संवेदनशील असतात. त्यांच्यावर इतरांची छाप सहजपणे पडते.

बोलण्यात फार लवकर हार जाणारी मीन राशी असते. ‘बुध’ या राशीत निचीचा धरला आहे, यावरून लक्षात येईल की बुधासारखा वाचेचा तरतरीपणाचा बुद्धीचा ग्रह जे कारकत्व दर्शवितो, त्याचे मीनेला वावडे असते. मीन व्यक्तीला अस्कलीखित बोलणे, विनोबुद्धी, हलकीफुलकी मनोवृत्ती यांचे जरा वावडेच असते. मीन ही व्यक्ती समाजात, नातेवाईकांच्यात मोकळेपणाने खिलाडूपणाने वागू शकत नाही. कर्तव्यतत्पर स्वभाव व पापभिरूपणा या गोष्टी त्यांच्या सहजवृत्तीवर दडपण आणतात. स्वभावात चंचलपणाही असतो. बरयाच मीन व्यक्ती भोळसट, अंधश्रद्धा असलेल्या, चिडचिड्या, लहान सहान संकटांनी गडबडून जाणारया, मनात अढी धरणारया, मनाच्या गोंधळामुळे पसारा वाढवणारया, निर्णयात परावलंबी असलेल्या असतात. मीन व्यक्ती ही धार्मिक, परमार्थी, अध्यात्मिक वगैरे असण्यापेक्षाही पापभिरू असते, हेच खरे.

मीन व्यक्तींचा स्वभाव मात्र सहनशील असतो, गरीब असतो. सुडाला प्रतिसूड देण्याचा कणखरपणा नसतो. मीन स्त्री दिसण्यात सात्विक असते. अलंकार, फॅशन किवा आधुनिक राहणी तिला फारशी मानवत नाही. दुसरयाचे मत आपल्याविषयी वाईट होऊ नये, म्हणून ती फार काळजी घेते. मीन पुरुष संसारात जरा जास्तीच रमतात. आपले छोटे घरटे सांभाळण्यात व प्रेमाची देवाणघेवाण करण्यात त्याला आनंद होतो. व्यवसायापेक्षा नोकरीत जास्ती रमतात.

मीन राशीच्या व्यक्तींना धकाधकीच्या दाहक वातावरणापेक्षा चेहरयावरील केविलवाण्या भावाने दुसरयाच्या मनात सहानुभूती निर्माण करणेच त्यांना पसंत असते. अन्यायाविरुद्ध आपल्या घणाघती व्यक्तीत्वाने लढण्यापेक्षा असह्य रुदनानेच त्या मेहरबानीची मागणी करतात. कठोर शब्द हे लोक कोणालाच बोलू शकत नाही. मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्यास मीन व्यक्तीला फार मानसिक त्रास होतो. उलट्या होतात, झोप लागत नाही.

मीन व्यक्ती ही अत्यंत भावूक असते. व्यक्ती व परिस्थिती याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रियेत भावनेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आपल्या अतिद्रिय ज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीवर ते निष्कारणच प्रेम करावयास लागतात वा एखाद्या व्यक्तीचा ते निष्कारणच तिरस्कार करावयास लागतात. त्यांच्या या भावनेमागे वा प्रतिक्रियेमागे तर्क अजीबात नसतो. या लोकांच्या ठायी सहानुभूती देखील भरपूर असते. जेव्हा जेव्हा हे लोक एखाद्या व्यक्तीस अडचणीत सापडलेली पाहतात वा एखादी व्यक्ती ही दु:खी किवा रोगी असल्याचे पाहतात, तेव्हा तेव्हा त्यांना त्या व्यक्तीच्या मदतीस धावून जावेसे वाटते. काही लोक त्यांच्या या प्रवृत्तीचा गैरवाजवी फायदा घेतात.

या राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती ही बरीच सुविकसित झालेली असते. ते मूलत: आदर्शवादी असतात व जगाच्या कठोर वास्तवापासून दूर पळून जाऊन, स्वप्नांच्या साम्राज्यात दंग होणे, हे यांना प्रिय असते. याच कारणाने अनेक महान कवी, लेखक व संगीतज्ज्ञ याच राशीचे पुरातन विचारानुसार गुरू या राशीचा स्वामी असल्याने, त्यांच्यात पापभिरूता आणि श्रद्धा प्रामुख्याने आढळते. नवीन विचारानुसार नेपच्यून हा अस्पष्ट, अनभिज्ञ आणि स्वप्नाळू ग्रह या राशीचा मालक आहे. त्यामुळे जे वास्तवात नाही, अशा गोष्टींकडे या राशीच्या व्यक्तींचे लक्ष ताबडतोब आकर्षित होते. जीवनाचे नेमके उद्दिष्ट ठरवणे, या राशीला अवघड जात असल्याने, त्यांच्या प्रयत्नात सातत्यापेक्षा धरसोडपण जास्त असतो. अभिनयाचा वरदहस्त या राशीला लाभला आहे. सिनेसृष्टी, कलाक्षेत्र असले व्यवसाय यांना आकर्षित करतात.

नक्षत्रांचा प्रभाव : पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती ही तीन नक्षत्रे या राशीत आहेत. पूर्वाभाद्रपदा नक्षत्र नशीबवान असते. ज्यावेळी जे हवे, ते त्यांना मिळते. जीवनाचा दृष्टिकोन उदात्त असतो. उत्तराभाद्रपदा नक्षत्रात भीती असते. त्यामुळे यशाचे प्रमाण कमी असते. रेवती नक्षत्र कलात्मक  आहे. पण मानसिक चंचलतेमुळे त्यांना कधीच समाधान लाभत नाही. उत्तराभाद्रपदा हे नक्षत्र शनिच्या मालकीचे आहे. त्यामुळे मालकी शनिची आणि रास गुरुची अशा दोन्ही प्रचंड बलाढ्य आणि सामथ्र्यशाली ग्रहांचा वारसा या नक्षत्राला लाभला आहे.

वैद्यकीय ज्योतिषशास्त्र : राशीचक्रात मीन राशी ही पायांचे (पावलांचे) प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या राशीच्या पायांचे आजार व दुखणी होऊ शकतात. पायांच्या अस्वाभाविक रचनेमुळे त्यांना सुयोग्य व सोयीची पादत्राणे मिळणे, हे देखील कठीण जाते. स्वास्थ्याबद्दल बोलायचे झाल्यास मीन व्यक्तींना सर्वाधिक भय हे मानसिक रोगांचेच असते. आत्यंतिक काळजी केल्याने, त्यांच्या पचनसंस्थेवर प्रतिकूल परिणाम व्हायची शक्यता असते. अनेक मीन व्यक्तींना बेरीबेरी, पक्षाघात यासारखे आजार व्हायची शक्यता असते. शरीरातून, विशेषत: हातापायांमधून वारंवार घाम येतो.

आर्थिक बाजू आणि कार्यक्षेत्र : मीन व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पैशांना विशेष महत्त्व नसते. त्यांच्यासाठी पैसा हा साधन असतो, सिद्धी नव्हे. आर्थिक व्यवसाय म्हणजे विदेशी माला आयात, निर्यात तसेच नर्सिंग व्यवसाय, उपहारगृह संचालन, सामाजिक कार्य, शिक्षण, लेखापाल इत्यादी व्यवसाय फायदेशीर ठरतात. हे लोक चांगले लेखक व चित्रकार देखील बनू शकतात. व्यवसायात भागीदारी ठेवणे, हे त्यांच्या दृष्टिने योग्य राहते.

अन्य विशेष माहिती : मीन राशी ही उत्तर होते. दिशेची द्योतक असते. या राशीचा वर्ण पांडुर (पीताभश्वेत) म्हणजे पिवळसर पांढरा सांगितलेला आहे. त्यांचा स्वामी गुरुचा मूलांक तीन आहे. हा अंक साहित्य, कला व वाणीद्वारे अभिव्यक्तीचा प्रतीक असतो. पाश्चात्त्य ज्योतिषानुसार या राशीचा स्वामी नेपच्यूनचा अंक सात असतो. हा अंक रहस्यमय मानला जातो व तो व्यक्तीस कुठल्याही अज्ञात रहस्याच्या संशोधनाकडे प्रवृत्त करू शकतो. मीन व्यक्तीत हा अंक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मीन राशी गुरवारचे प्रतिनिधीत्व करते. या राशीचे रत्न पुष्कराज आहे.

मीन राशीच्या प्रसिद्ध व्यक्ती : या राशीच्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, मा. दीनानाथ, बापू नाडकर्णी, जमनालाल बजाज, हेमामालिनी, देव आनंद, गुरू गोविदसिह, राजे शहाजी तर मीन लग्नावर जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, रविद्रनाथ टागोर, न. सि. फडके, विनोबा भावे, संत तुकाराम, पं. रविशकर, गॅलिलिओ, लुई आर्मस्ट्राँग वगैरे.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 5:59 pm

Categories: Marathi   Tags: ,

Seasons Sarees

Seasons Sarees

Seasons Sarees Seasons Sarees 2010 - 02 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - 03 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - 04 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - 05 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - 06 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - 07 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - 08 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - 09 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - 010 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - 011 - www.Glamourhuntworld.Blogspot.com Seasons Sarees 2010 - www.Glamourhuntworld.Blogspot.com

1 comment - What do you think?  Posted by admin - at 3:34 pm

Categories: Fashion   Tags:

Questions and answers 1

प्रश्नमंजुषा १
 

१. फळबाग योजना राबवणारे भारतातले पहिले राज्य कोणते?

अ. पंजाब, ब. गुजरात, क. महाराष्ट्र, ड. केरळ

२. दक्षिण भारताची गंगा (South Indian Ganga river)म्हणून कोणती नदी प्रसिद्ध आहे?

अ. कावेरी, ब. कृष्णा, क. गोदावरी, ड. तापी

३. बावन्न दरवाजांचे शहर (52 door city)म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?

अ. औरंगाबाद, ब. मुंबई, क. नाशिक, ड. नागपूर

४. भारतातील गुळाची बाजारपेठ कुठे आहे?

अ. अमरावती, ब. कोल्हापूर, क. जळगाव, ड. अहमदनगर

५. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या गावी सांगितली?

अ. पैठण, ब. देहू, क. आळंदी, ड. नेवासे

.

.

.

.

.

उत्तरे-
१. महाराष्ट्र,

२. गोदावरी,

३. औरंगाबाद,

४. कोल्हापूर,

५. नेवासे

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 9, 2013 at 6:12 pm

Categories: Questions   Tags:

New Launches – Gionee ELIFE E6 power-packed handset

New Launches – Gionee ELIFE E6 power-packed handset

You can now buy a power-packed handset without breaking the bank. The Gionee Elife E6 sports a Full HD display, ably supported by hardware innards that are prepped to handle any 3D mobile game, or movie format you might throw at it. Apart from being able to record Full HD videos, the E6 also responds to gestures, and can even be unlocked using face recognition. Also, the fact that the E6 looks like a certain smartphone, from a company named after a tempting fruit, only adds to its allure.

Specs: 5-inch, IPS (1920x1080px) | 1.5GHz quad-core processor | 2GB RAM | 32GB (internal) | 13MP rear cam, 5MP front cam | 3G, Wi-Fi, Bluetooth, A-GPS, FM radio | 2000mAh battery | Android 4.2 (Jelly Bean)

Website: www.gionee.co.in 

Price: 22,999

 

 

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 8, 2013 at 4:41 am

Categories: Tech   Tags:

New Launches – Sony GTK-N1BT compact audio system

New Launches – Sony GTK-N1BT

If you’re looking for a compact audio system for your bachelor pad, or even for your bedroom, you might want to give the Sony NeoTank a dekko. You can use either USB, NFC or Bluetooth to connect to supporting devices such as smartphones, tablets, laptops, TVs – and you can even tune-in to your favourite FM stations. Additionally, this nifty speaker sports colourful LED lights in the woofer that lights up to the beat of the music you play. Five equalizer presets, along with product design that fits either vertically or horizontally on your shelf, make this an ideal system for any type of music and décor.

Specs: (1x)60W, 16cm subwoofer; (2x)20W, 6.5cm full-range drivers | Bluetooth, NFC, USB, 3.5mm audio-in port | 20 FM pre-sets | Equalizer modes: R&B, Rock, Pop, Hip-hop, Flat | 554x213x280mm, 8.75kg

Website: www.sony.co.in 

Price: 16,990

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 4:40 am

Categories: Tech   Tags: ,

New Launches – HP Deskjet Ink Advantage 2545

New Launches – HP Deskjet Ink Advantage 2545

It is time to cut those trips to the neighbourhood photocopier and studio because the all-in-one HP Deskjet Ink Advantage 2545 lets you print, copy and scan documents and photographs within the comfort of your home. With built-in Wi-Fi, you will be able to send print commands wirelessly from your smartphone, tablet and laptop. It houses just two ink cartridges: Black and tri-colour (CMY), making set up and replacements a cinch. It isn’t a space hog and doesn’t look too bad either.

Specs: Print: 4800x1200dpi (colour), 600dpi (black) | Copy: 600x300dpi | Scan: up to 1200dpi | 60-sheet input tray | Paper sizes: A4, B5, A5, A6, DL envelope | 1 black + 1 tri-colour cartridge | LCD display | USB 2.0, Wi-Fi

Website: www.hp.com/in 

Price: 5,899; Cartridge: 475 each (up to 1,000 A4 pages)

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 4:39 am

Categories: Tech   Tags:

I’m looking for a notebook for around 60,000. Kindly suggest a few options.

I’m looking for a notebook for around 60,000. Kindly suggest a few options.

 

With a budget like this, you will be spoilt for choice with all top brands providing at least a couple of options…

NOTEBOOKS WITH FOURTH-GEN CORE I5 PROCESSORS: Intel’s fourth generation processors, codenamed Haswell, were announced as recently as July 2013, and are specifically designed to deliver power-saving and performance benefits. Machines with these chips include…

    HP Envy 15-J049TX ( 62,000): 15.6-inch LED display | 2.5GHz (3.1GHz Turbo Boost) Intel Core i5 processor | 8GB RAM | Nvidia GeForce GT 740M (2GB) graphics | 1TB hard drive | HD webcam | Backlit keyboard | (4x)USB3.0 | Win8

    Dell Inspiron 3537 ( 51,500): 15.6-inch LED touchscreen display | 1.6GHz (2.6GHz Turbo Boost) Intel Core i5 processor | 6GB RAM | Intel HD Graphics 4400 | 500GB hard drive | HD webcam | (2x)USB2.0, (2x)USB3.0 | Win8

    Alternatively, if you want a 14-inch screen, you could consider the HP Envy TouchSmart 14-K011TU ( 62,000) or the Dell Inspiron N5437 ( 56,400). It should be noted that both Dell machines do not have a backlit keyboard, but instead come with a DVD drive that’s not available on the HP machines. Also, the HP Envy 15-J049TX is the only model without a touchscreen display, but it comes with a 2.5GHz processor and a 2GB graphics chip that can handle most games at medium to high settings.

 

WITH THIRD-GEN (IVY BRIDGE) I7 CHIPS: Core i7 processors feature Hyper-Threading technology (not available on i5) that creates four additional virtual cores to increase multi-tasking performance. And although these are last year’s processors, they are more than capable of handling any computing task.

    Samsung NP550P5C-S05IN ( 60,000): 15.6-inch LED display | 2.4GHz (3.4GHz Turbo Boost) Intel Core i7 processor | 8GB RAM | Nvidia GeForce GT 650M (2GB) graphics | 1TB hard drive | HD webcam | (2x)USB2.0, (2x)USB3.0 | Win8

    Toshiba Satellite L850-Y3110 ( 52,000): 15.6-inch LED display | 2.4GHz (3.4GHz Turbo Boost) Intel Core i7 processor | 8GB RAM | ATI Radeon HD 7670M (2GB) graphics | 750GB hard drive | HD webcam | (1x)USB2.0, (2x)USB3.0 | Win8

    Here, the Samsung machine promises extra in the form of a better graphic processor, JBL speakers and a Blu-ray drive.

WITH SSDs: The Solid State Drive in these machines guarantees a faster boot-up time; ideal for those who’re looking for a system that’s up and running as soon as you hit the power button.

    Asus S400CA-CA028H Ultrabook ( 58,000): 14-inch LED display | 1.9GHz (3GHz Turbo Boost) Intel Core i7 processor | 4GB RAM | Intel HD Graphics 4000 | 500GB hard drive, 24GB SSD | 0.3MP webcam | (2x)USB2.0, (1x)USB3.0 | Win8

    Lenovo Ideapad U510 [59-349348] ( 57,000): 15.6-inch LED display | 1.7GHz (2.6GHz Turbo Boost) Intel Core i5 processor | 4GB RAM | Nvidia GeForce 610M graphics | 1TB hard drive, 24GB SSD | HD webcam | (2x)USB2.0, (1x)USB3.0 | Win8
    Before you finalize a model, we would advise you to physically check the build quality of the device for durability, check its display for viewing angles, and its keyboard for typing comfort.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 4:35 am

Categories: Tech   Tags:

« Previous PageNext Page »

© 2010 PupuTupu.in