Archive for October, 2013

Your LPG dealer can lose licence for late delivery

Your LPG dealer can lose licence for late delivery

Mumbai: There is some good news for homemakers. Oil marketing companies have introduced a new ‘star rating’ system for cooking gas dealers, which will ensure that LPG cylinders are refilled within a stipulated period of time. A dealer failing to provide refills on time risks losing his rating and even his licence if the delivery is not made in eight days.
    In the most-privileged category are the dealers with five-star rating who are expected to be most prompt. They would have to compulsorily deliver cylinders within 48 hours of booking. In case of not delivering within the stipulated period warranted by their rating, they get downgraded to the lower level (see chart for ratings).
    Apart from the timebound delivery for subscribers, the new system also puts pressure on dealers of the three oil marketing companies — IOC, BPCL and HPCL — to compete for more business among themselves as the government has introduced cylinder portability similar to that for mobile numbers. The best-rated dealer among the three OMCs stands to get additional subscribers from competitors who don’t serve their customers well.
    Portability is currently available in the top 15 cities and is expected to be introduced countrywide by next year. A few months back, under a new policy, the government had forced households to surrender multiple cooking gas connections that they used to keep as a buffer for delayed deliveries.
    Confirming the move, BPCL director (marketing) K K Gupta told TOI, “We have started the star ratings scheme to ensure competition among LPG dealers. If we find dealers are delivering cylinders beyond 8 days and get the least rating, we would take action against them and it may lead to cancellation of dealership.”
    Indian Oil has already introduced the new system for its dealerships in Goa. It found that more than 85% of its dealers there managed to achieve 5-star ratings in the last two quarters, which means most of the cylinders in Goa were delivered within 48 hours since April. Similarly, BPCL dealers achieved 100% efficiency in the northeastern states of Meghalaya, Arunanchal Pradesh and Nagaland and the Union territory of Daman & Diu, where most cylinders were delivered within 48 hours in the first quarter. However, HPCL dealers are yet to get 100% ratings in the five-star category in any of the states. They got 100% 4-star ratings in the Union territories of Daman and Diu and Dadra and Nager Halevi — most of the cylinders in the two UTs were delivered within four days of booking.
    IOC didn’t perform that well in Kerala, where 81% of the cylinders were delivered after eight days of booking. Pondicherry is the worst performing region for BPCL, where 50% of the LPG cylinders were delivered after eight days in the first quarter. This was worse in the January-March period, when most cylinders were delivered in more than eight days.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 8, 2013 at 4:30 am

Categories: India   Tags:

Indian Google boy Kautilya

Indian Google boy Kautilya

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 2, 2013 at 8:45 am

Categories: India   Tags:

The sandwich shop funny prank

 The sandwich shop funny prank

 

 

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - October 1, 2013 at 3:24 pm

Categories: World News   Tags:

Juggling Monkey Act

Juggling Monkey Act in Circus

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 3:21 pm

Categories: World News   Tags:

Masaledar Andabhurjee

 

मसालेदार अंडाभुर्जी

गाडीवरच्या भुर्जीसारखी मसालेदार चव घरी तयार केलेल्या भुर्जीला कधीच येत नाही. त्यामुळेच घरात कितीही भुर्जी खाल्ली, तरी तृप्तीचा खरा ढेकर दिला जातो तो भुर्जीच्या गाडीवरच!

पावभाजीच्या गाड्यांच्या जोडीने मुंबईच्या नाक्यानाक्यांवर उभ्या असलेल्या अंडा-भुर्जीच्या गाड्या म्हणजे एकेकाळी मुंबईची शान होती. भूक नसली, तरी या गाडीच्या शेजारून जाताना येणा‍ऱ्या वासानेच पोटात कावळ्यांची काव-काव सुरू व्हायची आणि इच्छा नसतानाही पावलं अंडा-भुर्जीच्या गाडीकडे वळायची. मग ‘ एक अंडा-भुर्जी ‘ अशी नुस्ती ऑर्डर दिली की, एखादा कोडवर्ड मिळाल्याप्रमाणे गाडीवाल्याचे हात एका लयीत कामाला लागायचे…

…सगळ्यात आधी शेगडीवर चढवलेल्या भल्यामोठ्या तव्यावर दोन चमचे तेल टाकलं जायचं. मग तेलावर कांदा-टोमॅटो टाकून ते चांगलं परतलं जायचं. नंतर गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ. हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव झालं की, एकेक अंडं उचलायचं आणि तव्याच्या कडेवरच ठॅकठॅक करत फोडून आतला द्राव मिश्रणावर ओतायचा. तवा गरमच असल्यामुळे क्षणात अंड्याचा द्राव फुलून येतो की लगेच लोखंडी कालथ्याने अंड्यासकट सगळं मिश्रण खालीवर करून पुन्हा एकजीव करायचं. मग कालथा त्या मिश्रणावर सतत आपटत राहायचा की हळूहळू एकजीव झालेल्या मिश्रणाचे बारीकबारीक तुकडे होत जातात आणि थोड्याच वेळात भुर्जी तयार होते. मग ती भुर्जी एका डिशमध्ये काढायची. तिच्यावर मस्त बारीक केलेली कोथिंबीर भुरभुरवायची आणि सर्व्ह करायची. सोबत त्याच भुर्जीच्या तेलावर खरपूस गरम केलेले दोन पाव. बस्स! मग आणखी काही सोबत नसलं तरी चालेल. किंबहुना नकोच!

गणेशोत्सव-नवरात्रोत्सवातले कायकर्ते असोत, उशिरा कामावरून घरी निघालेले नोकरदार असोत किंवा रात्रीची मुंबई पाहायला निघालेली मुलं असोत भूक लागली की रात्री उशिरापर्यंत अंडा-भुर्जीची गाडी असणार, याची त्यांना खात्री असायची. ऐंशी-नव्वदच्या दशकापर्यंत नाक्यानाक्यावरच्या या पावभाजी किंवा अंडाभुर्जीच्या गाड्यांवर खायला अख्खी मुंबई लोटायची. गाड्या कुठे उभ्या आहेत, आजूबाजूला काय आहे, याची कुणालाच पडलेली नसायची. त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असायचा, अंडा-भुर्जीचा स्वाद…

खरंतर गाडीवरची अंड्याची ही भुर्जी म्हणजे काही वेगळा पदार्थ नव्हे. बहुतेकांच्या घरी आठवड्या-दोन आठवड्यातून एकदा हमखास बनणारा. परंतु घरात बनवली जाणारी भुर्जी (किंवा अंड्याची कोशिंबीर) मुख्यतः हळद-मिर्ची टाकून केली जाते. गाडीवरच्या भुर्जीसारखी मसालेदार चव तिला कधीच येत नाही. त्यामुळेच घरात कितीही भुर्जी खाल्ली, तरी तृप्तीचा खरा ढेकर भुर्जीच्या गाडीवरच दिला जातो.

पण आता पालिकेच्या नियमांमुळे आणि नाक्यानाक्यावर पिझ्झाहट व मॅक्डॉनल्डसची दुकानं उघडल्यामुळे अंडा-भुर्जीच्या गाड्या केव्हाच बाद झाल्यात. तरीही गिरगाव नाका, दादर स्टेशनच्या बाहेर, किंवा सांताक्रुझला अजून कुठेकुठे अंडाभुर्जीच्या गाड्या लागतात आणि या गाड्यांवरच्या भुर्जीला दाद देणारी मंडळी तिथे हमखास हजेरी लावतात.

याच गाडीवाल्यांच्या जोडीला आता बोरिवली वेस्टला गोखले शाळेच्या समोर राजूभाई भुर्जीवाल्याची टपरी सुरू झालीय. सुरुवात गाडीवरून झालेल्या राजूभाईच्या अंडा-भुर्जीने थोड्या कालावधीत ग्राहकांना अशी काही चटक लावली की, राजूभाईला गाडीऐवजी छोटी जागा घेऊन टपरीच टाकावी लागली. राजूभाई भुर्जीवाल्याचं नाव आता अख्ख्या बोरीवली-कांदिवलीत झालंय. विशेष म्हणजे त्यांच्याकडची भुर्जी आणि अंड्याचे इतर पदार्थ खायला मराठी लोकांबरोबरच गुजराती पब्लिकही आघाडीवर असतं. आपल्या भुर्जीच्या लोकप्रियतेचं गमक सांगताना राजूभाई म्हणतात- ‘ भुर्जीचा सगळा भार मसाल्यांवर असतो. मसाल्याची भट्टी चांगली जमली की भुर्जी चांगली व्हायलाच हवी!

राजूभाईंचं म्हणणं खरं आहे… भुर्जी दुकानातली असो, किंवा गाडीवरची, सगळ्यात आधी मसाल्याच्याच घमघमाट पसरतो आणि मग व्हायची ती जादू होते… पावलं आपोआप अंडा-भुर्जीच्या गाडीकडे वळतात.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 2:23 am

Categories: Health   Tags:

पर्समध्ये दडलंय काय? What is in girls purse?

मुलींच्या पर्समध्ये काय-काय असतं या विषयीची उत्सुकता समस्त

मुलांमध्ये असते. ते मुलांना कळालं, तर ते नक्की चक्रावून जातील यात शंका नाही. टाकूयात एक नजर मुलींच्या पर्समध्ये. तसंच, त्यातील वस्तू बाळगणं का महत्त्वाचं असतं, हेही जाणून घेऊया.

purse

*मेकअप सामान  Makeup things

पावडर, काजळ, आयशॅडो, लिप-बाम, फाउंडेशन, लिपग्लॉस, आयलायनर अशी यादी केली, तर संपता संपणार नाही. दर दोन-तीन तासांनी टचअप करण्यासाठी या सगळ्याची मुलींना गरज पडतेच.  Powder, Eye-shadow, Lip-balm, Lip-gloss, Eye liner

*औषध  Medicine

डोकेदुखी, सर्दी, चक्कर, पित्त अशा त्रासांसाठी लागणाऱ्या गोळ्या हमखास पर्समध्ये असतात. बऱ्याचदा त्या आईनं जबरदस्ती ठेवायला लावल्यानंही बाळगल्या जातात. for Headache, Cold

*पेपर-चिली स्प्रे  Pepper Chilly Spray

हल्ली ज्या काही घटना घडताहेत, त्यामुळे असे स्प्रे बरोबर ठेवणं ही गरजच बनली आहे.

*स्टेपलर, पिना, पंचिंग मशिन  Stepler, Pins, Punching Machine

वर दिलेल्या गोष्टी ठीक आहेत; पण हे जरा अतीच आहे.

*नोटपॅड, पेन, पेन्सिल  Notepad, Pen, Pencil

कुठंही काहीही नोट करून घेण्यासाठी अत्यंत सोप्प पडतं म्हणून ही स्टेशनरी मुली सोबत ठेवतात.

*टाचणी, सुई, पिन, दाभण , Tachni, Sui, Dabhan

टाचणी, सुई, पिन एकवेळ चालून जाईल; पण दाभण तेही पर्समध्ये? यावर एका मुलीने सांगितलं, की बसमधून प्रवास करताना स्वरक्षणासाठी हल्ली लोक सुई, टाचणीला वगैरे जुमानत नाहीत; म्हणून दाभण!

*लवंग, वेलची, बडीशेप, खडीसाखर  Lavang, Velachi, Badishep, Khadisakhar

खाल्यानंतर किंवा बरं वाटत नसेल, तर तोंडाला चव येण्यासाठी लवंग, वेलची, बडीशेप उत्तम.

*मेणबत्ती, काडेपेटी , Candle, Matchbox

एकदम अनोळखी ठिकाणी लाइट वगैरे गेले, तर पंचाईत नको म्हणून कायम या गोष्टी बरोबर असाव्यात, असं बऱ्याच आई सांगतात.

*ता. क: हा लेख वाचून झाल्यावर आम्हाला नाही वाटत कोणी मैत्रिणीला वा बायकोला परत विचारेल, की तुम्ही पर्समध्ये काय आणता ते?

 

 

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 2:19 am

Categories: Filmy   Tags: ,

गुगल ड्राइव्हसाठी टिप्स

मोठमोठ्या आकाराच्या फाइल्स शेअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी गुगल ड्राइव्हने मोठी सोय उपलब्ध केली आहे. आता बहुतांश जणांना गुगल ड्राइव्हचा वापर करण्याची सवय झाली आहे. अशांसाठी गुगल ड्राइव्ह वापरण्यासाठीच्या या काही टिप्स…

की-बोर्ड शॉर्टकट

कुठलेही काम वेगात करायचे असेल तर की-बोर्ड शॉर्टकट्स हा त्याचा राजमार्ग आहे. गुगल ड्राइव्हसाठीही हे शॉर्टकट्स उपलब्ध आहेत. गुगल ड्राइव्हच्या होमपेजवर शिफ्ट आणि ? हे बटन दाबून तुम्ही याच्या की-बोर्ड शॉर्टकट्सची यादी पाहू शकता.

मोठ्या फाइल्स अॅटॅच करण्यासाठी

गुगल ड्राइव्हमुळे फोटो आणि फाइल पाठविणे खूपच सोपे झाले आहे. जीमेलद्वारे ड्राइव्हवरील १० जीबीपर्यंतच्या फाइल अॅटॅच करून पाठविता येतात. या फाइल इमेल ज्या व्यक्तीला पाठविला ती व्यक्ती सहजरित्या ऑनलाइन पाहू शकतील. इमेल पाठविताना या फाइल शेअर केलेल्या नसतील तर गुगल ड्राइव्ह त्याची सूचना देईल.

गुगल ड्राइव्ह एक्स्टेंशन

गुगलने नुकतेच ड्राइव्हचे क्रोमसाठीचे एक्स्टेंशन सादर केले आहे. यामुळे क्रोमवरील काही इमेजेस किंवा वेबपेज राइट क्लिक करून थेट गुगल ड्राइव्हवर सेव्ह करता येईल. यामुळे क्रोम वापरणाऱ्यांसाठी वेबपेजेस थेट गुगल ड्राइव्हवर सेव्ह करणे सोपे झाले आहे.

फाइल व्हर्जन
गुगल ड्राइव्हमध्ये एका फाइलच्या १०० पर्यंत रिव्हिजन करता येतात आणि त्या ३० दिवसांपर्यंत पाहता येतात. फाइल मेन्यूमधून रिव्हिजन हिस्ट्रीद्वारे हे बदल पाहता येतात. यामुळे बदल करण्यापूर्वीची फाइलही पाहता येईल आणि पूर्वीच्या व्हर्जन आवश्यक नसतील तर डिलीट करून ती स्पेस इतर गोष्टींसाठी वापरता येईल.

डिफॉल्ट डॉक्युमेंट फोल्डर

गुगल ड्राइव्हचा वापर डिफॉल्ट डॉक्युमेंट फोल्डर म्हणूनही करता येऊ शकतो. विंडोजमध्ये कुठल्याही डॉक्युमेंटवर राइट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये गेल्यावर इनक्लूड फोल्डरवर क्लिक करून गुगल ड्राइव्ह फोल्डर सिलेक्ट करून सेट सेव्ह लोकेशनवर क्लिक करा.

डिलीट केलेल्या फाइल्स मिळवणे

गुगल ड्राइव्हवरील फाइल्स चुकून डिलीट झाली , तरी घाबरण्याचे कारण नाही. ऑनलाइन व्हर्जनवर क्लिक करून डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधून मोअर सिलेक्ट करा आणि ट्रॅश सिलेक्ट केल्यावर तुमची फाइल तुम्हाला मिळेल. यावर राइट क्लिक करून तुम्ही ती पुन्हा रिस्टोअर करू शकता.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 1:57 am

Categories: India   Tags:

मुस्लिम युवकांना नाहक त्रास नको!

दहशतवादाच्या नावाखाली निरपराध मुस्लिम युवकांना नाहक ताब्यात घेऊ नका , असे पत्र केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवून नवा वाद निर्माण केला आहे. मुस्लिम युवकांना अयोग्य पद्धतीने अडकवून सुरक्षा यंत्रणाकडून त्रास देण्यात येत असल्याबद्दल केंद्र सरकारकडे अनेक तक्रारी येत आहेत. आपल्या मूलभूत अधिकारांवरच गदा येत असल्याची या युवकांची भावना असल्याचे शिंदेंनी पत्रात म्हटले आहे.

हे पत्र म्हणजे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले मतांचे राजकारण असल्याची टीका भाजपने केली असून धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिंदे यांनी तातडीने राजीनामा द्यावा , अशी मागणी केली आहे. भाकपनेही काँग्रेसवर मुस्लिम अनुनयाचा आरोप केला आहे. शिंदेंनी मात्र भाजपची राजीनाम्याची मागणी फेटाळली आहे. तसेच काँग्रेसने शिंदेंची पाठराखण केली आहे.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 1:55 am

Categories: India   Tags:

भांडुपमध्ये गँगवार; एकाची हत्या

मुंबईतील भांडुप येथे सोमवारी रात्री संतोष चव्हाण या गुंडाची अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. संतोष चव्हाण हा भांडुप पश्चिमेकडील साई हिल रोड परिसरात जुगाराचा अड्डा चालवत होता.

रात्री अकराच्या सुमारास काही तरुण चव्हाणच्या जुगाराच्या अड्ड्यावर पोहोचले. तिथे त्यांनी चव्हाणवर पाच गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर जमाल नावाचा एक इसम जखमी झाला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. जुगारातील वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा संशय असून अधिक तपास सुरू आहे.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 1:54 am

Categories: Uncategorized   Tags:

ज्येष्ठांचे वय वाढवले! ६०चे ६५ केले

ज्येष्ठांना त्यांच्या हक्काच्या सोयीसुविधा , सवलती देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने तयार केलेले बहुप्रतीक्षित ज्येष्ठ नागरिक धोरण सोमवारी राज्य सरकारने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जाहीर केले. पण , या धोरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वरून ६५ वर नेल्याने ही भेट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची थट्टाच ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक संघटनांकडून व्यक्त होत आहे. ज्येष्ठांचे वय पाच वर्षांनी वाढवल्याने सुमारे २२ लाख ज्येष्ठ नागरिक यापुढेही सोयींपासून वंचित राहणार आहेत!

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक धोरण निश्चित केल्यानंतर १५ वर्षांनी राज्यात असे धोरण निश्चित करण्यात आले आहे. तब्बल पाच वर्षे अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी , सरकारी अधिकारी यांच्या बैठका , चर्चा झाल्यानंतर त्याचा आराखडा निश्चित झाला. संयुक्त राष्ट्रे आण‌ि केंद्र , राज्य सरकारच्या विविध धोरणांमध्ये ६० वर्षांवरील व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ असे स्पष्ट केले असतानाही राज्य सरकारच्या धोरणामध्ये वयोमर्यादा बदलून सरकारने पुन्हा ज्येष्ठांना डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही या तरतुदीला विरोध करणार असून लवकरच बैठक घेऊन पुढचा कार्यक्रम ठरवू , असे आइस्कॉनचे माजी अध्यक्ष डॉ. किंजवडेकर यांनी सांगितले.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 1:53 am

Categories: India   Tags:

« Previous Page

© 2010 PupuTupu.in