‘प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय’

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंवर आज पैठणमध्ये दशक्रिया विधी करण्यात आला. मुंडेंवर प्रेम करणारे राज्यभरातील कार्यकर्ते अद्याप दु:खातून सावरलेले नाहीत.

मुंडेंच्या निधनानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर मुंडेंच्या भाषणांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहेत. मुंडेंचा असाच एक व्हिडीओ  सध्या व्हॉट्स अॅपवर शेअर होत आहे.  हा व्हिडीओ झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमातील आहे.

या कार्यक्रमात आमंत्रित पाहुण्याने कोणालाही फोन लावायचा असतो. यावेळी गोपीनाथ मुंडेंनी चक्क स्वर्गीय प्रमोद महाजन यांना फोन लावला. यावेळी तुम्ही मला एकट्याला सोडून का गेला, असा सवाल मुंडेंनी प्रमोद महाजनांना फोनवरून विचारला. तसंच तुम्ही मैत्रीचा डाव अर्ध्यावर सोडून गेला. हा अन्याय आहे. तुम्ही परत या, असं मुंडे म्हणाले.

 महाजनांच्या आठवणीने मुंडे यावेळी भारावून गेले. एक सख्खा मित्र गेल्याने मुंडे अजूनही दु:खी होते. त्यामुळे या कार्यक्रमातही मुंडे आपलं दु:ख लपवू शकले नाहीत..पाहा त्याच कार्यक्रमाचा हा व्हिडीओ

व्हिडीओ – झी मराठी ‘खुपते तिथे गुप्ते’