Every Delhi Girl In The World

तरुणींच्या प्रायव्हेट चर्चा ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल

तरुणींच्या प्रायव्हेट चर्चा ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल

तरुणींची मानसिकता आता लपलेली नाही, ती आता सामान्य झाली आहे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात दिल्लीतील मुलीने केलेल्या वक्तव्याला रेकॉर्ड करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये बनविलेल्या या व्हिडिओमध्ये शहरातील मुली कशा उघडपणे बोलतात. त्यांना कोणत्या प्रकारचे मुलं आवडतात. त्यांना काय आवडत नाही. त्या शिवाय तरूणी दररोज कोणत्या गोष्टींवर गप्पा मारतात, ते यात दाखविण्यात आले आहे.

व्हिडिओ सोशल वेबसाइट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. लाखो लोकांननी याला पाहिले आणि शेअरही केले आहे.

बिइंग इंडियन नावाच्या यू ट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि तो व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रत्येक जण जाणू इच्छितो की दिल्लीत वाढलेल्या तरूणींची मानसिकता काय आहे.

एव्हरी इंडियन गर्ल नावाने हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला १७ लाख हिट्स मिळाल्या आहेत.