R R Patil in Hospital

आर.आर.पाटील यांचे हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल

आर.आर.पाटील यांचे हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं चित्र आहे.

आर. आर. पाटलांचे दोन फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत. यात एका फोटोत आर आर पाटील चालत येत आहेत, तर एका फोटोत आर.आर.पाटील हे संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतांना दिसत आहेत.

लीलावती रुग्णालयात आर आर पाटील काही दिवसांपासून तोंडाच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. आबा उपचारांना प्रतिसाद देत असून, प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

 दरम्यान काही दिवसांपूर्वी आबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या अंजनी या गावात महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.