Sow Potato Reap Tomato

चमत्कार! पेरले बटाटे, उगवले टोमॅटो

सर्वशक्तिमान निसर्ग चमत्काराव्दारे आपल्या शक्तीची जाणीव करून देत असतो. असाच एक चमत्कार बुलढाणा जिल्ह्यत घडलाय.

म्हणतात ना.. निसर्गापुढे कुणाचंच चालत नाही… निसर्ग आपली शक्ती दाखवून देतो. निसर्गाच्या शक्तीचा अनुभव नुकताच बुलढाण्यातल्या एका शेतकऱ्याला आलाय. जानेफळ गावातले शेतकरी भास्कर दाभाडेंच्या शेतात बटाट्याच्या झाडाला चक्क टोमॅटोही लागलेत. हा चमत्कार पाहण्यासाठी आता त्यांच्या शेतावर गर्दी होतेय.

बटाटयाच्या झाडाला टोमॅटो लागलेत तरी कसे असा प्रश्न दाभा़डे आणि इतर शेतकऱ्यांनाही पडला होता.  पण निरीक्षण केल्यानंतर टोमॅटोत जशा बिया आढळतात तशाच बिया फळात आढळून आल्या. त्यामुळं एकाच झाडाला खाली बटाटे आणि वरती टोमॅटो असा प्रकार खरचं घडल्याचं स्पष्ट झालं.

सर्वसामांन्यांना चमत्कारामागेही असतं विज्ञान… हा प्रकार घडलाय तो निसर्गात झालेल्या बदलांमुळं… गारपीट, वातावरणात झपाटयानं झालेले बदल यामुळं वनस्पतीशास्त्रही चक्रावून गेलं आणि मग बटाटयाच्या टोमॅटो लागण्याचा विपरित प्रकार घडला. आता कृषितज्ज्ञही या प्रकाराचा अभ्यास करताहेत

पेरले तसे उगवते अशी म्हण आहे… पण इथं मात्र पेरले बटाटे आणि उगवले टोमॅटो असा प्रकार घडलाय… निसर्गाचं संवर्धन केलं नाही तर निसर्गही विपरित वागू लागतो असा धडा या प्रकारानं पुन्हा एकदा मिळालाय.